बॅंकेत काम करणाऱ्या महिलेस गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सावंतवाडी - आपण बॅंकेतून बोलत आहे, असे सांगून अंधेरी येथील बॅंकेत काम करणाऱ्या महिलेला ऑनलाइन गंडा घालण्यात आला. तिच्या क्रेडिट कार्डमधील पंधरा हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. संबंधित महिला मूळ आंबोली येथील आहे. हा प्रकार काल (ता. 16) सकाळी घडला. खात्यातील पैसे वजा झाल्याचा मॅसेज आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. एम. आर. एंटरप्रायझेसच्या नावाने ते पैसे जमा झाल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी; मूळ आंबोली येथील संबंधित महिला अंधेरी येथील स्टेट बॅंकेत क्‍लार्क म्हणून नोकरीला आहे. त्या आज आपल्या पतीसोबत आंबोली येथे फिरत असताना त्यांच्या मोबाइलवर एक फोन आला. आपण दिल्ली येथून स्टेट बॅंकेच्या मुख्य कार्यालयातून बोलत आहे. तुमचे क्रेडिट कार्ड बंद पडले आहे. त्यामुळे ते पुन्हा सुरू करण्यासाठी कार्डचा नंबर सांगा, असे सांगितले. मात्र, मोबाइलवर अशा पद्धतीने कोणाला माहिती देऊ नये, हे माहीत असल्यामुळे त्यांनी नकार दिला. मात्र, पुन्हा संबंधितांनी फोन करून त्यांच्या खात्यांची पूर्णत: डिटेल्स सांगितली. आपण बॅंकेतून बोलत आहे ते पैसे आपल्याला पुन्हा तुम्हालाच द्यायचे आहेत. त्यामुळे बिनधिक्कत पिन नंबर सांगा, असे सांगितले. खात्यासंदर्भात योग्य माहिती आणि बॅंकेबाबत अन्य माहिती साईट सांगितल्यानंतर त्यांनी आपल्या क्रेडिट कार्डचा पिनकोड दिला. 

त्या युवतीने पिनकोड घेऊन तत्काळ खात्यातून पंधरा हजार रुपये काढून घेतले आणि त्याचा पुन्हा ओटीपी देण्याची विनंती केली. या वेळी ओटीपी आपण देणार नाही, अशी भूमिका सौ. मसुरकर यांनी घेतली; परंतु तो दिला नाही तर तुमचा सर्व व्यवहार अर्धवट राहणार असल्याचे त्या युवतीने सांगितले. त्यानंतर मसुरकर यांनी पुन्हा ओटीपी दिला. त्याचा आधार घेऊन मसुरकर यांच्या खात्यातले पंधरा हजार रुपये संबंधितांनी काढून घेतले. 

आपली फसवणूक झाली आहे, हा प्रकार लक्षात येताच सौ. मसुरकर यांनी आपल्या पतीसमवेत आंबोली दूरक्षेत्रावर धाव घेतली. मात्र, हा सर्व प्रकार ऑनलाइन फसवणुकीचा असल्यामुळे येथील पोलिस ठाण्यात त्यांना तक्रार देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. एम. आर. एन्टरप्रायझेस कंपनीच्या नावाने हे पैसे जमा करण्यात आले आहेत. याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत ठाणे अंमलदार राजलक्ष्मी राणे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित महिलेचा तक्रार अर्ज घेण्यात आला आहे. याबाबत पुढील निर्णय पोलिस निरीक्षक शंकर पाटील घेणार आहेत.

Web Title: cheating case

टॅग्स