पोलिस, पत्रकारांवर थर्मामिटरची गन; आरोग्य विभागाकडून तपासणी 

check with an infrared thermometer for police and journalists
check with an infrared thermometer for police and journalists
Updated on

मंडणगड - कोरोना विरुध्दच्या लढाईत मंडणगड तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सतर्क राहणाऱ्या मंडणगड पोलिस कर्मचारी व तालुक्यातील घडामोडींचा वेळोवेळी मागोवा घेणाऱ्या पत्रकारांची आरोग्य विभागाच्या वतीने इन्फारेट थर्मामिटरच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. तसेच तालुक्यात नव्याने दाखल होणाऱ्या नागरिकांचीही म्हाप्रळ, लाटवण चेक पोस्टवर आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही ही आश्वासक बाब आहे.


शहर व तालुक्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची आरोग्य विभागाने लेजर गनच्या माध्यमातून तपासणी केली. इन्फारेट थर्मामिटरच्या मदतीने मानवी शरिराचे तापमान समजते. यात काही संशायस्पद आढळल्यास किंवा व्यक्ती तापामुळे आजारी असल्यास लक्षणे त्वरीत ओळखता येतात. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून पोलिस प्रशासनातील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. विविध ठिकाणी त्यांचा बंदोबस्तासाठी वावर होतो आहे. कर्तव्य बजावताना अनेक नागरिकांच्या संपर्कात यावे लागत आहे. २२ एप्रिल रोजी मंडणगड पोलीस स्थानकात लोक प्रतिनिधी, पत्रकार, पोलीस कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. 

मंडणगड तालुक्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना तालुक्याच्या प्रवेश द्वारावर ताब्यात घेण्यात येत असून त्यांची तपासणी करून त्यांना विलगिकरण कक्षात १४ दिवसांसाठी कोरोन्टाईन करण्यात येत आहे. २३ एप्रिलपर्यंत विलगिकरण कक्षात देवी पाडा, मुंबई, चिराबाजार, जोगेश्वरी, दिवा, गोरेगाव, ठाणे, सांगली, नालासोपारा, विलेपार्ले, मालाड, गोवंडी, पोलादपूर, पाली, श्रीवर्धन, कोल्हापूर, कर्जत, धुळे, दांडा, महाड, वरळी, नवी मुंबई येथून आलेल्या ५३ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. त्यात १५ महिलांसह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर यांचा समावेश आहे. १८ एप्रिलपर्यंत विलगिकरण कक्षातील कालावधी पूर्ण झालेल्या २१२ नागरिकांना घरी सोडून होम कोरोन्टाईन करण्यात आले आहे. तसेच होम कोरोन्टाईन केलेल्या नागरिकांना वेळोवेळी त्या त्या गावात जावून त्यांची पाहणी करण्यात येत असून आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. तालुक्यात २३ एप्रिल पर्यंत सुमारे ४ हजार ४८१ नागरिक दाखल झाले आहेत. तसेच विदेशातील ४६ नागरिक होम कोरोन्टाईन करण्यात आले आहेत. त्यातील निम्याहून अधिक नागरिकांचा कोरोन्टाईन कालावधी पूर्ण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com