येथे नाही कोरोनाची धास्ती ; चढ्या दराने होतेय चिकणची विक्री

chicken rate increase in dapoli city
chicken rate increase in dapoli city

दापोली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात चिकनच्या किमती कमी झाल्या आहेत. परंतु, दापोली शहर याला अपवाद आहे. शहरात चिकनचे  दर चढेच असून धुलवडीमुळे ग्राहकांची पावले चिकन मार्केटमध्ये वळत आहेत. 

चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरस रोगामुळे संपूर्ण जग हादरले असून या रोगाचा प्रादुर्भाव भारतातही काही प्रमाणात झाला आहे, त्यामुळे देशभर या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हायअलर्ट घोषीत केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रोगाचा फटका देशभरात चिकन उद्योगावर झाला असून चिकन खरेदी करण्यासाठी ग्राहकच येत नसल्याने अत्यंत कमी भावात चिकन विकण्याची परिस्थिती या व्यापाऱ्यांवर आली आहे. कोल्हापूर सारख्या भागात चिकन विक्रेत्यांनी चिकन बिर्याणी महोत्सव आयोजित करून कमी किमतीत चिकन विकणे सुरू केले  आहे. काही ठिकाणी 10 रुपयांत कोंबडी विकण्याची वेळ या विक्रेत्यांवर आली आहे. त्यामुळे हा व्यवसाय तोट्याचा ठरू लागला आहे. 

असे असले तरी दापोली शहरातील मटण मार्केटमध्ये चिकनचे दर अद्याप चढेच आहेत. या मार्केटमध्ये 15 चिकन विक्रेते असून येथे बॉयलर कोंबडीचा दर शंभर रुपये किलो असून, साफ केलेले  बॉयलर चिकन 160 रुपये किलो या दराने विकले जात आहे. गावठी कोंबडी 280 रुपये किलोने विकली जात आहे. एवढा चढा दर असूनही ग्राहक या दराने चिकन विकत घेत आहेत. 
शिमग्याच्या सणाला आलेले चाकरमानी या मार्केटमध्ये दिसून येत असल्याने दापोली मार्केटमध्ये  कोरोनाची भीती नसल्याचे दिसून येत आहे. 


कोरोना व्हायरसमुळे आमचा धंदा पन्नास टक्के कमी झाला आहे. दरामध्ये फारसा फरक झालेला नाही. मात्र लोकांनी घाबरून जाऊ नये.

मुस्तकीन भारदे, चिकन विक्रेते, दापोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com