esakal | बापरे ! कोकणात होळीची आहे अशी भयाण प्रथा....
sakal

बोलून बातमी शोधा

shimgotsavs celebration in savarde ratnagiri kokan marathi news

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे शिमगोत्सवाची वेगळी प्रथा आहे. येथे चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात.

बापरे ! कोकणात होळीची आहे अशी भयाण प्रथा....

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागीरी) : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे शिमगोत्सवाची वेगळी प्रथा आहे. येथे चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात. या खेळात मानपानाप्रमाणे गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहून लाकडे पेटवतात. नंतर ढोल-ताशांच्या गजरात आरोळ्या ठोकत सुमारे तीस फुटाच्या अंतरावरुन ती पेटती लाकडे (होलटे) पाच वेळा एकमेकांवर फेकतात. मात्र ही जळती लाकडे अंगावर पडून कोणीही जखमी किंवा भाजत नाही. शेवटी उरलेली लाकडे एकत्र करुन त्यांची होळी केली जाते. ही प्रथा अंगावर शहारे आणणारी आहे. होलटा शिमगा असे या प्रथेचे नाव आहे. होलटे शिमग्या’ने अक्षरशः थरकाप उडतो. 

हेही वाचा- कोरोनामुळे परदेशी सहलींना बसला असा फटका....

होलटे होम होळीचे नियम
या होलटे होम होळीचे काही नियम आहेत. दोन गट एक मेकांसमोर उभे राहतात. लहान मोठे यांच्या हातात जळका होलटा म्हणजे लाकूड असते. प्रत्येक वाडीतली मुले या खेळात सहभागी होतात. ढोल-ताशा आणि सनईच्या वादनात होलटे खेळणार्‍या खेळाडूंच स्वागत होते. पायात चप्पल न घालता एकमेकांवर हे होलटे फेकले जातात. वाईट इच्छा किंवा मद्यपान केलेल्या व्यक्तीच्याच माथी हे पेटते लाकूड पडते आणि त्याला शिक्षा मिळते, असा या प्रथेतील समज आहे. त्यामुळे अनेक चाकरमानीसुद्धा हा खेळ खेळण्यासाठी येतात.

हेही वाचा- कोरोनामुळे या घातक आजारचा विसर; दहा वर्षात गेलेत एवढे बळी -

सावर्डेतील होलटे होम

पाच वेळा एकमेकांवर हे पेटते निखारे फेकले जातात. एका वेळी एका बाजूने एकच गट हे पेटते निखारे फेकतो. या होलटे शिमग्याचे’ वैशिष्ट्ये म्हणजे पेटती लाकडे एकमेकांवर मारुनही कोणीही जखमी होत नाही. त्यामुळे अगदी चाकरमानी सुद्धा ही धाडसी होळी खेळतात. शिमग्यातली प्रथा म्हणून ही होळी खेळली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी पुणे आणि मुंबईवरुन अनेक चाकरमानी येतात. अवघ्या पाच मिनिटांच्या खेळानंतर, त्याठिकाणी एकही लाकूड किंवा निखारा आढळून येत नाही. होळी उत्सवात अनेक परंपरा पहायला मिळतात. मात्र थोडी अघोरी का होईना सावर्डेतील हा होलटे होम शिमग्यात खेळलाच जातो.