पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Eknath Shindes order to Collector of Konkan

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा

रत्नागिरी - जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशाराही दिला असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वित्त व जीवित हानी होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर स्थितीतील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांसह कोकणातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे ते संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरादर पाऊस सुरू आहे. नागरिकांना पावसामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी. तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी, असे आदेशमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

Web Title: Chief Minister Eknath Shindes Order To Collector Of Konkan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..