esakal | कोकणातील चिपी विमानतळावरुन श्रेयवाद रंगणार; राणेंनी केली 'ही' घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

narayan rane uddhav thackeray

कोकणातील चिपी विमानतळावरुन श्रेयवाद रंगणार; राणेंनी केली 'ही' घोषणा

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम : सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सिंधुदुर्गमधील चिप्पी परूळे विमानतळावरून येत्या 9 ऑक्टोबरला विमानसेवा सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेच त्याचे उद्घाटन करतील, असे सांगतानात शिवसेनेने कोकणमध्ये कोणताच प्रकल्प आणला नाही. त्यांनी आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, अशी स्पष्टोक्ती सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.

शिवसेनेने देखील या विमानतळाचे उद्घाटन सात ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप, राणे कुटुंब आणि शिवसेना असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. सेनेने कोकणात‌ कोणता प्रकल्प पूर्ण केले, हे सांगा. त्यांचे कोणतेच खासदार कामाचे नाही. फक्त 'कलेक्शन मास्टर' आहेत. हा विमानतळ आम्ही तिथे आणला. त्याचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री हेच करतील. त्यांना (सेनेला) कुणी उद्घाटनाची परवानगी दिली आहे. विमानतळ हा केंद्राचा विषय आहे, असे राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

हेही वाचा: कोरोनाचा नियम मोडला अन् 5 वर्ष तुरुंगात झाला 'क्वारंटाईन'

गेली सात वर्षे हा विमानतळ बांधून तयार होता, पण वाहतुकीला खुला नव्हता. आता कुठे सिंधूदुर्ग-मुंबई आणि ठिकाणी विमानसेवा सुरू होणार आहे, असे सांगताना २०१४ पर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केला. अन्य कुणी विमानतळ बांधला नाही. आता कुणी श्रेय घेऊ नये,असा इशारा राणे यांनी दिला आहे.

शिवसेना सुरू नाही; बंद करते

मुख्यमंत्र्यांना या उद्धाटनाला बोलावणार का, या प्रश्नावर त्यांना बोलावयची गरज वाटत नाही, असेही राणे म्हणाले. शिवसेनेत पुरामुळे नुकसान झाले. त्यावेळी त्यांनी मदत जाहीर केली. पण काय दिले? काहीच दिले नाही. कोकणात कोणता प्रकल्प त्यांनी पूर्ण केला? शिवसेना काही कामाची नाही. तिथे शिवसेनेने रोजगार आणला नाही, उद्योग धंदे बंद आहेत. काय त्यांनी आहे? शिवसेना सुरू करतच नाही, ते फक्त सगळे बंद करतात, अशी टीका त्यांनी केली.

विमानतळ ते शहर असा रस्ता पूर्ण करायचा होता, त्यासाठी राज्याने पैसा दिला नाही. त्याला ३५ कोटी रुपये लागणार आहेत. तो रस्ता आम्ही नितीन गडकरी यांच्याकडून पूर्ण करून घेऊ. केंद्रच हे काम पूर्ण करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: नागपुरात चर्चेनंतरच लॉकडाऊन; आपत्ती व्यवस्थापन समिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीवर बंधने आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर नारायण यांनी घणाघाती टीका केली. हिंदूच्या सणांना का बंदी? त्यांच्या सभांना, कार्यक्रमांना का बंदी नाही? घरावर दगड मारायला पाठवतात, त्याला का नाही बंदी. मुख्यंंमंत्री बोलतात एक करतात एक. दुसऱ्याच्या घरावर दगड मारतात, त्यांचा ते सत्कार करतात. हे कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका राणे यांनी केली.

मुख्यमंत्री हे तिसऱ्या लाटेची भीती दाखवतात. तिसरी लाट दाखवून यांना घरातच बसायचे आहे. इतर राज्यांमधे तिसरी लाट का नाही? फक्त महाराष्ट्रातच ही लाट आहे. एवढे करूनही दीड लाख लोक गेलीच ना. नर्स नाही, डॉक्टर नाही. काय अवस्था आहे वैद्यकीय व्यवस्थेची. त्यांनी या विषयावर बोलूच नये.

- नारायण राणे

loading image
go to top