esakal | 'चिपी विमानतळाचे उद्घाटन भूमिपुत्रांच्या हस्ते करा'
sakal

बोलून बातमी शोधा

'चिपी विमानतळाचे उद्घाटन भूमिपुत्रांच्या हस्ते करा'

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधारी यांच्यात वाद सुरू आहे.

'चिपी विमानतळाचे उद्घाटन भूमिपुत्रांच्या हस्ते करा'

sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाचे तीन वेळा भूमिपूजन केले तर तत्कालीन पालकमंत्र्यांनीही विमानतळाचे उद्घाटन केले. विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय मिळवण्यासाठी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने जमिनी दिल्या, अशा ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन व्हावे, अशी अपेक्षा आहे, असे मत मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत उपरकर म्हणाले, ‘‘चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधारी यांच्यात वाद सुरू आहे. विकासापेक्षा आरोप-प्रत्यारोप श्रेयासाठी हा वाद सुरू आहे. ज्यांनी जमीनी दिल्या त्या चिपी आणि पाट गावचे ग्रामस्थ याला तिव्र विरोध करीत आहेत. मुळात या विमानातून ७५ प्रवासी येणार आहेत. यासाठी हे श्रेयवाद घालण्यापेक्षा लाखोंनी प्रवासी मुंबई-गोवा महामार्गाने येत आहेत. त्या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत, रस्त्यावर पडलेल्या खड्डयांबाबत, नव्याने बांधण्यात आलेल्या पुलांच्या निकृष्टतेबाबत हे सत्ताधारी का बोलत नाहीत? केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत हे विरोध का करत नाहीत?’’

हेही वाचा: Photo: छगन भुजबळांचा भाजी विक्रेत्यापासून आत्तापर्यंतचा प्रवास

चिपीच्या विमानतळाचे भूमिपूजन राणे यांनी आतापर्यत तीन वेळा केले. स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या आहेत. त्यातील एखाद्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले तर खऱ्या अर्थाने जमीनदारांना त्यांचे श्रेय मिळेल. सत्ताधारी आणि विरोधक हे आरोप-प्रत्यारोप करत आहेत; पण जिल्ह्याच्या विकासाबाबत काहीच बोलत नाहीत. याचे कारण ही सरकारे अपयशी ठरल्याने लोंकाचा दुर्लक्ष व्हावा, यासाठी वाद करीत आहेत. मुळात राज्य सरकारनेही विमानतळाला आवश्यक असलेले रस्ते दर्जेदार करायला हवे होते. पाण्याची व्यवस्था हवी होती. रस्त्यावरून चालणारी वाहन खड्डामुळे अडचणीत आली आहेत. असे खड्डे जर विमानतळाच्या रस्त्याचे असतील तर जिल्ह्याचे हसे होणार आहे. विमानतळ सुरू करण्यापूर्वी त्यांची दुरावस्था सुधारावी, अशी मागणीही उपरकर यांनी केली आहे.

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ११३ कोटीची कामे झाली आहेत; मात्र या योजनांमधील या ठेकेदाराने रस्त्यांची कामे पूर्ण केली आहे. त्यांना निधीअभावी पैसे मिळालेले नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार जिल्ह्याच्या विकास कामांकडे दुर्लक्ष करत आहेत. सत्ताधारी जबाबदारी धुडकावत आहेत.’’

हेही वाचा: मित्रांसोबत हॉलिडे सेलिब्रेट करा 'या' परफेक्ट डेस्टिनेशनसह..

किरीट सोमय्या का बोलले नाहीत?

कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली कित्येक वर्षे रखडले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? या रस्त्याने चाकरमानी प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला. निकृष्ट दर्जाचे चौपदरीकरण याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या का बोलत नाहीत? हे समजायला सिंधुदुर्गातील जनता दुधखुळी नाही?, असा टोलाही उपरकर यांनी लगावला आहे.

सहा हजार कोटीचा रस्ता कशासाठी?

कोकणातील राष्ट्रीय महामार्ग रखडला आहे. सागरी महामार्गा कवळ आश्वासन दिले आहे. असे असतांना सरकारने 6 हजार कोटीचा नवा रस्ता का प्रस्तावित केला आहे. आदी पुर्व नियोजित रस्त्याची आश्वासने पाळा मगच नव्या घोषणा करा, अशी टिका परशुराम उपरकर यांनी केली आहे. चौपदरीकरण गेली काही वर्षे रखडले आहे. त्याच किनारपट्टी भागासाठी सागरी महामार्गाची घोषणा झाली; पण एका ही रस्त्याचे काम सरकारने प्रामाणिकपणे पुर्ण केले नाही, ही वस्तूस्थिती असताना नव्या रस्त्याच्या आणि महामार्गाच्या घोषणा कशासाठी? असा सवालही उपरकर यांनी सरकारला विचाराला आहे.

हेही वाचा: गौरीच्या सणाला हटके दिसायचाय ; या टिप्स करा फॉलो

loading image
go to top