"चिपी'च्या गरजा राज्याने पूर्ण कराव्या ः प्रभू

chipi airport issue statement suresh prabhu kokan sindhudurg
chipi airport issue statement suresh prabhu kokan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - चिपी विमानतळासाठी आवश्‍यक केंद्रस्तरीय परवानग्या मी मंत्री असल्यामुळे मिळू शकल्या आणि त्यासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची राहिली; मात्र आता कल्पनेतील विमान खूप उडवले. खऱ्या अर्थाने विमान उडवण्यासाठी चिपी विमानतळाच्या उर्वरित सगळ्या गोष्टी राज्याने पूर्ण कराव्यात, असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली. 

जागतिकस्तरावरील "एक्‍सपर्ट डेव्हलपमेंट कौन्सिल' हा प्रकल्प उभारण्यासाठी राज्याने जागा उपलब्ध करून केंद्राला सहकार्य करावे. जेणेकरून याठिकाणी सर्व क्षेत्रातील तज्ञ निर्माण होऊ शकतील.

यासाठी भाजपचा प्रयत्न राहणार असल्याचेही खासदार प्रभू यांनी सांगितले. 
जिल्हा दौऱ्यावर असलेल्या श्री. प्रभू यांनी आज येथील पालिकेला भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 
खासदार प्रभू म्हणाले, ""सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री नारायण राणे व मी मिळून एकत्रितरित्या केले होते. केंद्रस्तरावर त्याच्या राहिलेल्या परवानग्या मी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळवून दिल्या.

विमानतळाचा उडान योजनेमध्ये समावेश करून घेतला; मात्र राज्याकडून आवश्‍यक पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने विमानतळाचे काम रखडले होते. 31 जानेवारीपर्यंत त्या पूर्ण करून देण्याचा शब्द राज्याने केंद्राला दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत सिंधुदुर्गातील जनतेच्या कल्पनेची उड्डाण झालेल्या चिपी विमानतळावरून प्रत्यक्ष विमान उड्डाण होऊन जनतेचे स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे.'' 
राज्याने विकासाच्या बाबतीत केंद्राला सहकार्य करणे गरजेचे आहे.

गुजरात, उत्तर प्रदेश येथील धर्तीवर दोडामार्ग तालुक्‍यात शंभर ते दीडशे एकर जागेमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ निर्माण करणारा जागतिक स्तरावरील "एक्‍सपर्ट डेव्हलपमेंट कौन्सिल' हा प्रकल्प उभारण्याचा केंद्राचा मानस आहे. त्यासाठी जागाही पाहण्यात आली होती; मात्र ती उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने केंद्राला सहकार्य करणे गरजेचे आहे. असे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणचा विकास होण्यास वेळ लागणार नाही.

देशातील अनेक राज्याने मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. केवळ कमी जागा मिळाल्यामुळे राज्यातील सत्ता गेली; परंतु यापुढे ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी पुन्हा हा महाराष्ट्राच्या विधानसभेवर निश्‍चितच कमळ फुलेल.'' यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, परिमल नाईक आदी उपस्थित होते. 

दौऱ्याला राजकीय किनार नको 
श्री. प्रभू म्हणाले, ""मी खासदार असल्याने निश्‍चितच या दौऱ्याला आगामी लोकसभेच्या निवडणुकीचा संदर्भ लावण्यात येतो; मात्र मला निवडणुकीला उभे राहण्यासाठी कुठलाही दौरा करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे या दौऱ्याला कोणीही राजकीय किनार लावू नये.''

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com