चिपी विमानतळ माझेच अपत्य - नारायण राणे 

चिपी विमानतळ माझेच अपत्य - नारायण राणे 

सावंतवाडी - चिपी विमानतळ हे माझेच अपत्य आहे. ते आणण्यासाठी मी काय केले, किती खस्ता खाल्या, हे माझे मलाच माहीत आहे. जमीनदारांचा विरोध अंगावर घेतला. त्यामुळे माझ्या अपत्याला मी विरोध कसा करणार असा प्रतिप्रश्‍न माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांना केला.

तालुक्‍यातील पक्ष सदस्य नोंदणीसाठी येथील रवींद्र मंगल कार्यालयात राणे यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, प्रणिता पाताडे, विकास कुडाळकर, प्रमोद कामत, मोहिनी मडगावकर, संजू परब, गीता परब उपस्थित होते. राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात विमान उतरवण्यासाठी मी खो घालत आहे, अशी टीका केसरकर यांनी केली; परंतु मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विमानतळाला जन्म घातला आहे. ते पूर्ण करण्यासाठी किंवा त्यासाठी जागा मिळवण्यासाठी मी स्थानिक शेतकऱ्यांना अंगावर घेतले. त्यामुळे मी जन्माला घातलेल्या अपत्याला मी कसा काय विरोध करीन.’’

ते  म्हणाले, ‘‘जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत हे दोघेही कमी पडले आहेत. जिल्हा विकासाच्या तुलनेत आणखी दहा ते बारा वर्षे मागे गेला आहे. आगामी काळात ही चूक पुन्हा करू नका. राज्याच्या राजकारणात राणे नसतील तर काय होईल याचा अंदाज तुम्हाला आला असेल. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तिन्ही आमदार एक खासदार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा असावा, यासाठी प्रयत्न करा.’’

रवी मडगावकर, पंकज पेडणेकर, जावेद खतीब, दिलीप भालेकर, प्रमोद सावंत, अन्वर खान, परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, उत्तम पांढरे, तारक परब, दया परब आदी उपस्थित होते.

परब यांना आमदारकीची अप्रत्यक्ष ऑफर 
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीड लाख मतदार आहेत. त्यातील एक लाख मतदार नोंदणी करा आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे ते माझ्याकडून मिळवा, असे सांगून तालुकाध्यक्ष परब यांना राणेंनी अप्रत्यक्ष आमदारकीचे ऑफर दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com