चिपळूण : 113 जणांची 36 लाखाच्या फसवणूक प्रकरणी संचालकाला अटक

chiplun case organization crime of 113 people police arrested by accused in ratnagiri
chiplun case organization crime of 113 people police arrested by accused in ratnagiri

चिपळूण (रत्नागिरी) : नोकरी व कमिशनचे आमिष दाखवत शहरालगतच्या खेर्डी येथे श्री स्वामी समर्थ कृपा एंटरप्रायझेस या मार्केटिंग कंपनीद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या संचालकाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय रामभाऊ चव्हाण ( खेर्डी - माळेवाडी ) असे अटक केलेल्या संचालकाचे नाव आहे. 

चव्हाण याने नोकरी व कमिशनचे आमिष दाखवून मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून 23 जणांची 23 लाख 73 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आला होता. या संदर्भात केलास मालुसरे यांनी चिपळूण पोलिस स्थानकांत तक्रार दिली होती. यानंतर फसवणूक झालेले ग्राहकही पुढे येऊ लागल्याने यातून आतापर्यंत 113 जणांनी आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दिल्या आहेत. त्यानुसार 36 लाख 84 हजाराची रक्कम झाली आहे. 

सापळा रचला पकडले 

फसवणूक प्रकरणी चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल होताच, तो पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथकही तयार केले होते. चव्हाण हा चिपळूण रेल्वेस्थानकाठिकाणी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सापळा रचला असता, त्यात चव्हाण सापडला. .

संपादन - स्नेहल कदम  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com