Chiplun CNG queue
esakal
चिपळूण : गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाल्यानंतर आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली (Ganeshotsav Return Travel) आहे. मात्र, वाहतूक कोंडीपेक्षा सीएनजीसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात अडथळा ठरत आहेत. आठ किलो सीएनजी भरण्यासाठी वाहनचालकांना दहा ते बारा तास रांगेत उभे राहावे लागत आहे.