चिपळूण पुन्हा नव्याने उभे करू: मुख्यमंत्र्यांचे शब्द हवेत ; पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

udhhav thackeray meeting

चिपळूण पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत; मुख्यमंत्र्यांचे शब्द हवेत

चिपळूण (रत्नागिरी) : येथील महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही काळजी करू नका, चिपळूण (Chiplun) पुन्हा नव्याने उभे करू,’ असा शब्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ते शब्द हवेत विरल्याचे दिसून येत आहे. महापुराला दीड महिना लोटला तरीही पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

महापुरामध्ये चिपळूण शहरासह खेर्डी कळंबस्ते परिसरात सुमारे १० ते १२ फूट पाणी आल्याने अनेक घरांत, दुकानात पाणी शिरले, तसेच खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. यामुळे प्रापंचिक साहित्य, दुकानातील माल तसेच कारखान्यांमधील उत्पादनांचे मोठे नुकसान झाले. दोनच दिवसांपूर्वी चिपळूण व्यापारी महासंघटनेने येथील तहसीलदारांना शासकीय मदतीसंदर्भात निवेदन दिले असून, मदत न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. या इशाऱ्याकडे शासन किती गांभीर्याने पाहते, हे लवकरच समजून येईल. मात्र, तोपर्यंत काय करायचे, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. काही मोजक्या व्यापाऱ्यांनी आपल्या हिमतीवर व्यवसाय सुरू केले आहेत. उर्वरित पूरग्रस्त व्यापारी आपला पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी चाचपडत आहेत. याकडे शासनाला लक्ष देण्यास वेळ नाही.

हेही वाचा: देशातील पहिले लक्झरियस क्रूझ मुंबई-गोवा मार्गावर होणार सुरु

या आहेत अडचणी

- इन्शुरन्स कंपन्यांच्या जाचक अटींमुळे क्लेम मंजुरीत अडचणी

- व्यापारी, उद्योजक व वाहनधारक जाचक अटींमुळे कचाट्यात

- बँकांचीही वेळ काढूपणाची भूमिका

खेर्डी औद्योगिक वसाहतीत कारखानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवसायिकांचेदेखील मोठे नुकसान झाले असून, या सर्वांसमोर पुन्हा व्यावसायिकदृष्ट्या उभे कसे राहावे, असा प्रश्न आहे. शासनाचे दुर्लक्ष, इन्शुरन्स कंपन्यांच्या जाचक अटींमुळे आम्ही आर्थिक संकटात आहोत. शासनाने आमच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले नाही, तर उपोषण छेडू.

- गजानन ऊर्फ दादा कदम, उपाध्यक्ष, नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशन

Web Title: Chiplun Flood 2021 Uddhav Thackeray Speech Flooded Waiting For Help Ratnagir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uddhav Thackeray