चिपळूण : दीड कोटीच्या ऐवजासह सोने कारागिराचे अपहरण

तोतया अधिकाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे
अपहरण प्रकरण
अपहरण प्रकरणई सकाळ

चिपळूण: आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून तीन तोतया अधिकाऱ्यांनी चिपळूण बाजारपेठेतील सोने कारागिराचे दीड कोटीच्या ऐवजासह अपहरण केले होते. रविवारी रात्री ही घटना घडली होती. याप्रकरणातील तोतया अधिकाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अशरफ शेख (वय ४०, रा. चिपळूण) असे या कारागिराचे नाव असून, तीन तोतया अधिकाऱ्यांनी त्यांना मुंबईच्या दिशेने घेऊन गेले. मात्र, महामार्गावरच माणगाव येथे अशरफ यांना सोडून तिघेजण मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अशरफ यांनी सुटका झाल्यानंतर तत्काळ चिपळूण पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तोतया अधिकाऱ्यांना पकडले.

या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या तिघांना पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की अशरफ शेख हे चिपळूण बाजारपेठेतील ओतारी गल्ली परिसरात सोन्याचे दागिने बनवण्याचे काम गेली अनेक वर्षे करीत आहेत. मूळचा पश्‍चिम बंगाल येथील असलेल्या या कारागिरांचे ओतारी गल्लीत छोटे दुकानही आहे. या दुकानावर रविवारी रात्री ८.३० वाजता तिघे तोतया अधिकारी तेथे आले व आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत अचानक धाड टाकली. सोनाराबरोबर ते इंग्रजीत संभाषण करू लागले. त्याला आयकर ओळखपत्र दाखवले. नंतर चौकशीसाठी आमच्यासोबत यावे लागेल, असे सांगत सोबत दागिने व रक्कम ही घ्यावी लागेल, असेही बजावले. कारागिर अशरफ या तिघांसोबत जाण्यास तयार झाले.

अशरफ यांच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी काही लोकांनी ९ लाखांची रक्कम दिली होती. तसेच, सोन्याचे दर कमी असताना त्यांनी स्वत: २ किलो सोने खरेदी करून ठेवले होते. नऊ लाख रोख आणि सोन्यासह एकूण १ कोटी साठ लाखांचा ऐवज घेऊन ते एका कारमधून मुंबईच्या दिशेने घेऊन गेले. मात्र, महामार्गावरच माणगाव येथे अशरफ यांना सोडून दिले आणि तिघे तोतया अधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर अशरफ यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच, त्यांचे वर्णनही सांगितले. त्यानंतर चिपळूण पोलिसांनी सूत्र हलविली. ते तिघे पुण्याच्या दिशेने गेल्याचे समजले. चिपळूण पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क करून यंत्रणा फिरवली आणि पुण्यात त्या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांचा ताबा घेण्यासाठी चिपळूण पोलिसांचे एक पथक पुणे येथे रवाना झाले आहे.

चिपळुणमधील घटना ; तीन तोतया अधिकारी ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com