चिनी वस्तूंकडे ग्राहकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

जर्मन साहित्याला प्राधान्य - ‘मेड इन इंडिया’ला बरे दिवस
चिपळूण - गणेशोत्सवातील सजावटीसाठी आवश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पावले आता बाजरपेठेकडे वळू लागली आहेत. भारत-चीन संबंधांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी चिनी मालावर अघोषित बंदी आहे. भारतीय बनावटीचे साहित्य अधिक चांगले आणि टिकाऊ असते. चिनी साहित्य स्वस्त असले, तरी लगेच बिघडते. त्याची सहज मोडतोड होते. त्यामुळे नागरिकांनी ‘मेड इन इंडिया’ला प्रधान्य दिले आहे. चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय अनेक ग्राहकांनी घेतला आहे. 

विजेचे दिवे, तोरणे आदी दुकानांत चिनी वस्तूंवरील बहिष्काराचे प्रतिबिंब उमटत आहे. चिनी बनावटीचा माल पडून राहिला असून रोषणाईसाठी ग्राहक भारतीय आणि जर्मन बनावटीच्या माळा, तोरणे आणि दिव्यांना प्राधान्य देत आहेत. अल्पजीवी असल्या तरी स्वस्त आणि आकर्षक असल्यामुळे चिनी बनावटीच्या माळा आणि तोरणांना गणेशोत्सवाच्या सजावटीत फार महत्त्व होते. मात्र यावर्षी विक्रेत्यांनी चिनी बनावटीच्या साहित्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीच्या शिल्लक राहिलेल्या साहित्याचे काय करायचे, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. यावर्षी लेझर मशीन, रोप लाईट, एलईडी माळ, जेली माळ, ड्रॉप लाईट, फोकस लाईट, डमरू माळ, चेरीलाइट आशा विविध माळा उपलब्ध आहेत. यामध्ये चायना माळ ६० रुपये ते ८०० रुपये तर भारतीय आणि जर्मन माळ १०० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.

यावर्षी आम्ही चिनी बनावटीच्या वस्तूच खरेदी केलेल्या नाहीत. त्यामुळे भारतीय व जर्मन बनावटीचे साहित्य आमच्याकडे उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी चिनी मालालाही मागणी नाही.
- हिदायत सय्यद, विक्रांता गोवळकोट रोड

चिनी मालावर स्वयंप्रेरणेने बंदी आहे. भारतीय बनावटीचे साहित्य अधिक चांगले आणि टिकाऊ असते. चिनी साहित्य स्वस्त असले, तरी लगेच बिघडते. त्याची सहज मोडतोड होते. त्यामुळे आम्ही ‘मेड इन इंडिया’ला प्राधान्य देत आहोत.
- विक्रम शिंदे, चिपळूण

Web Title: chiplun konkan news customer neglect to Chinese goods