Ratnagiri : चिपळूण पालिका ; फॉर्म्युल्यावर आघाडीचे भवितव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun palika

चिपळूण पालिका ; फॉर्म्युल्यावर आघाडीचे भवितव्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राष्ट्रवादी कॉंग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असले तरी कोणाच्या पारड्यात किती जागा पडणार, तसेच नगराध्यक्षपदाचा फॉर्म्युला कसा असेल, यावरच आघाडीचे भवितव्य असणार आहे.

चिपळूण पालिका निवडणूक आली की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा विषय चर्चेत येतो आणि की गेल्या काही वर्षांपासूनची ही परंपरा कायम आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत राजकीय कुरघोडीतून आघाडी होऊ शकली नाही. यामध्ये दोन्ही पक्षाचे नुकसान झाल्याचे सर्वश्रुत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर येथील पालिकेत महाविकास आघाडी स्थापन झाली.

आता चिपळूण पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याकरिता राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार रमेश कदम यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास उत्सुक असल्याचे सांगत आघाडीसाठी पहिले पाऊल टाकले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेत्यांची एक बैठक झाली. यामध्ये आपण आघाडी करू या, याबाबत चर्चा झाली. मात्र, आघाडी कोणत्या मुद्यांवर असेल, याबाबत कोणतीही सखोल चर्चा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. आघाडी संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आम्ही सांगू, असे देखील सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

एक नजर..

  1. चिपळूण पालिका निवडणुकीचे पडघम

  2. गेल्या निवडणुकीत आघाडी झाली नाही

  3. दोन्ही पक्षाचे नुकसान झाल्याचे सर्वश्रुत

  4. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन

  5. नंतर पालिकेत महाविकास आघाडीची स्थापना

  6. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेत्यांची झाली बैठक

  7. काँग्रेससोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी उत्सुक

आघाडी की बिघाडी ;काँग्रेसला नगराध्यक्षपद अडीच वर्षांसाठी

काँग्रेसला नगराध्यक्षपद अडीच वर्षांसाठी मिळावे, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटातून बोलले जात आहे. दुसरीकडे बंडखोरी होणार नाही, यादृष्टीने देखील प्रयत्न होणे आवश्यक होणार आहे. जागांची व उमेदवार अदलाबदल होणार नाही, याची देखील काळजी घेतली पाहिजे, असे काँग्रेसच्या गोटातून चर्चिले जात आहे. एकंदरीत काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अटी घातल्या जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

आघाडी न होण्यासाठीही प्रयत्न

काही पदाधिकारी राजकीय, वैयक्तिक द्वेषातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पदाधिकाऱ्याना राजकीय दांडगा अभ्यास असल्याचे देखील बोलले जात आहे.

loading image
go to top