दळवटणेतील 'त्या' आजीसाठी पोलिस बनले देवदूत

मुझफ्फर खान 
रविवार, 29 मार्च 2020

उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी यंत्रणा कामाला लावली. एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू त्यांनी त्या घरात पाठवून दिल्या आणखी काही आवश्यकता असेल तर मला फोन करा अशीही सूचनाही केली. त्यामुळे संचारबंदीच्या काळात चिपळूणचे पोलिस अक्षरशः देवदूत सारखे लोकांच्या उपयोगी येत असल्याचे चित्र आहे.

चिपळूण - साहेब आजी गावातील घरात एकटीच आहे, घरातील धान्य देखील संपलय’असा मेसेज रत्नागिरीचे अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मोबाईलवर आला. गायकवाड यांनी चौकशी केल्यानंतर तो चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावातील असल्याचे समजले. गायकवाड यांनी चिपळूण पोलिसांशी संपर्क साधून आजीला मदत करण्याची सूचना केली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी यंत्रणा कामाला लावली. एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू त्यांनी त्या घरात पाठवून दिल्या आणखी काही आवश्यकता असेल तर मला फोन करा अशीही सूचनाही केली. त्यामुळे संचारबंदीच्या काळात चिपळूणचे पोलिस अक्षरशः देवदूत सारखे लोकांच्या उपयोगी येत असल्याचे चित्र आहे. 

हे पण वाचा -  कोल्हापुरात होम क्वारंटाइनचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथील इंदू गणपत मोहिते या 70 वर्षाच्या आजीच्या घरात अन्नधान्य नव्हते. जिल्हा बंदीमुळे तिचे नातेवाईक मुंबईत अडकले आहेत. मुंबईतील तिच्या एका नातेवाईकाने अप्पर पोलिस अधिक्षक गायकवाड यांच्याशी संपर्क साधून माझ्या आजीला मदत करा अशी विनंती केली. त्यानंतर गायकवाड यांनी पोलिस यंत्रणा कामाला लावली. उपविभागीय पोलिस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना दूरध्वनी करून त्या आजीला काही मदत करता येईल का अशी विचारणा केली. त्यानंतर ढवळे यांनी स्वखर्चाने एक महिन्याचे रेशन, मास्क आणि सॅनिटायझरची खरेदी करून पोलिस कर्मचार्‍यांना दळटवणे येथे पाठवले. दळवटणे हे गाव सह्याद्रीच्या कुशीत आणि अतिष्य दाटीवाटीच्या रस्त्यातून जाणारे तरीही चिपळूणचे पोलिस तोंटाला मास्क लावून दुचाकीने तिथपर्यंत पोहचले. मोहिते यांच्या आजीला भेटून जीवनावश्यक वस्तू दिल्या. यापुढे काही लागले तर आम्हाला फोन करा अशी सूचना करून चिपळूणचे पोलिस तेथून परतले. या कठीण प्रसंगी माणुसकी जपण्याचा आदर्श चिपळूण पोलीसांनी या घटनेतून दिला. 

 

हे पण वाचा -  पुढाऱ्यांचं पत्र दाखवुन जर शहरात एंट्री करत असाल तर तुमच्या होणार फौजदारी दाखल... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiplun police help for old women