कोल्हापुरात होम क्वारंटाइनचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 case filed against one accused in kolhapur because Home Quarantine Violation
case filed against one accused in kolhapur because Home Quarantine Violation
Updated on

उजळाईवाडी (ता. करवीर ) - येथील युवकावर होम क्वारंटाइनचे उल्लंघन कल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अनिल पाटील (वय २४ रा. तुळजाभवानी नगर, उजळाईवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. विशाल हा होम क्वारंटाइन आदेशाचे उल्लंघन करून गावामध्ये फिरत होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती अशी, विशाल हा 23 मार्च रोजी मुंबईहून उजळाईवाडीमध्ये आला होता. यावेळी कोरणा विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्रातून आल्यामुळे त्याला त्याच्या राहते घरी होम क्वारंटाइनच्या सूचना दिल्या होत्या.  त्याच बरोबर सध्या संपूर्ण देशभर लॉक डाऊन असल्यामुळे नागरिकांना जमाव बंदी व संचार बंदी करीत विनाकारण बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परंतु या आदेशाचे उल्लंघन करत विशाल हा गावात विनाकारण फिरताना आढळून आला. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा 
१८९७ अंतर्गत गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला. या बरोबर गोकुळ शिरगाव पोलिसांकडून होम क्वारनटाईन नागरिकांवर लक्ष देण्यात येत कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, उजळाईवाडीतील 'अथायु ' हॉस्पिटलमध्ये  कोरोना संसर्गित तरुणाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णाची प्रगती होत असल्याचे 'अथायु ' हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

११५ जण होम क्वारनटाईन 

मुंबई, पुणे व फ्रान्स आधी ठिकाणाहून उजळाईवाडी येथे आलेल्या ११५ जणांना होम क्वारनटाईन  रहाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्र उजळाईवाडीच्या आरोग्य सेविका रसिका लाड व कर्मचाऱ्यांचे नियमित लक्ष आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com