चिपळूणात पोलिसांनाही कोरोनाची लागण ; अलोरे, शिरगाव पोलीस ठाण्यात शिरकाव...

Chiplun Police infected coronavirus Two policemen from Chiplun and Alore Shirgaon police stations infected
Chiplun Police infected coronavirus Two policemen from Chiplun and Alore Shirgaon police stations infected

चिपळूण (रत्नागिरी) :  कोरोनाच्या कालावधीत कोव्हिडं योद्धा म्हणून काम करणार्‍या पोलिसांना आता कोरोनाची बाधा होत असल्याने चिपळूण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


चिपळूण व अलोरे- शिरगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यातील पोलिसांचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे काम सुरू झाले आहे तर अलोरे मधील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. चिपळूण शहराबाहेर ग्रामीण भागात ही आता कोरोना पसरू लागला आहे.

सोमवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात चिपळूण व अलोरे -शिरगाव पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी याना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील इतर सर्व कर्मचारी यांचे स्वब नमुने तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे. कोरोना बाधित पोलिसांच्या संपर्कात आलेल्याचे नमुने घेतले जाण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे चिपळूण सहअलोरे -शिरगाव ठाण्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com