
रत्नागिरीत सेवानिवृत्त शिक्षिकेची राहत्या घरी हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. शिक्षिकेचा मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडालीय. महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. वर्षा मधुकर जोशी (वय ६८) या ज्येष्ठ महिलेचा अज्ञात व्यक्तींनी हातपाय बांधून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.