चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघात राष्ट्रवादीत इनकमिंग 

चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघात राष्ट्रवादीत इनकमिंग 

देवरूख - ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. हे सेटिंग विधानसभेचे असले तरी याचा फटका लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण - संगमेश्‍वर मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना केवळ 6 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर शांत न बसता शेखर निकम यांनी गेल्या साडेचार वर्षात या मतदार संघातील संपर्क कायम ठेवला आहे. पायाला चाके लावल्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या घरगुती कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती असतेच शिवाय सार्वजनिक कार्यक्रमातही शेखर निकम सदैव पुढे असतात. याचाच फायदा त्यांना होऊ लागला आहे. राजकारणातील स्वच्छ चेहऱ्याचा माणुस म्हणून निकम यांचे नाव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द आहे. याच आपल्या छबीवर ते संपूर्ण मतदार संघातील युवा मतदार आणि जुन्या जाणत्या लोकांना आकर्षित करीत आहेत.

गेल्या दोन तीन महिन्यात शेखर निकम यांनी या मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धुरळा उडवला असून संगमेश्‍वर तालुक्‍यात गेल्या दोन महिन्यात पक्षप्रवेशाचे किमान 30 कार्यक्रम घेण्यात आले. यातून शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

संगमेश्‍वरप्रमाणेच चिपळूणातही त्यांनी प्रवेशाचा असाच सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीत जाणारा वर्ग हा युवा चेहरे असून याचा फटका अर्थातच शिवसेनेला बसण्याची दाट शक्‍यता आहे.
विधानसभा निवडणुकीला अजुन सहा महिने अवकाश आहे. त्याआधीच शेखर निकम यांनी लावलेला धडका पाहता याचा राजकीय फटका सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे. 

हा वर्ग स्वाभिमानकडे वळणार 

शेखर निकम आणि स्वाभिमानचे या निवडणुकीतील उमेदवार डॉ. निलेश राणे यांचे सख्य पाहता आगामी काळातील राजकारणासाठी राष्ट्रवादीचा हा सारा वर्ग स्वाभिमानकडे वळण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे विधानसभेसाठी होत असलेले राष्ट्रवादीतील इनकमिंग लोकसभेसाठी शिवसेनेला धोकादायक ठरण्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com