'त्या' घोटाळ्याला महाविकास आघाडीकडून पूर्णविराम ; चव्हाण बोलतात ते त्यांचे व्यक्तिगत मत'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

गेल्या काही दिवसांपासून सेनेच्याच सदस्या अनुजा चव्हाण या घरघंटी विषयावर माध्यमांकडे जाहीर वक्तव्ये करीत आहेत.

चिपळूण - पंचायत समिती सेस फंडातून वाटप झालेल्या घरघंटी व शिलाई मशिनबाबत पंचायत समितीच्या मासिक सभेत दोनवेळा दीर्घकाळ चर्चा झाली आहे. सभापतींनी त्यावर स्पषटपणे खुलासेदेखील केले आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी त्यावर तोडगा काढून या विषयाला पूर्णविराम दिलेला आहे, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पंचायत समितीच्या सेस फंडातून महिला बालविकास विभाग व समाजकल्याण विभागातर्फे घरघंटी, शिलाई मशिन व झेरॉक्‍स मशिन वाटप करण्यात आले होते. यासाठी निवड केलेल्या लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर निधी वर्ग केला होता. यावरून पंचायत समितीच्या दोन मासिक सभा गाजल्या. महाविकास आघाडीच्या सदस्यांनी संयुक्त बैठक घेतली. त्यामध्ये चर्चा होऊन घरघंटी, शिलाई मशिन विषयावर पडदा टाकण्यात आला.

हे पण वाचापंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून केला साजरा

 

सदस्यांच्यादृष्टीने हा विषय संपला असल्याचे सेनेचे सदस्य प्रतापराव शिंदे यांनी सांगितले. तरीही गेल्या काही दिवसांपासून सेनेच्याच सदस्या अनुजा चव्हाण या घरघंटी विषयावर माध्यमांकडे जाहीर वक्तव्ये करीत आहेत. त्यांनाही याबाबतची सूचना दिलेली आहे; मात्र त्यानंतरही त्यांनी माध्यमांकडे जाहीर वक्तव्ये केल्यास त्यास पक्ष बांधिल नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल, असा खुलासाही तालुकाप्रमुख शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे घरघंटी विषयावर पडदा पडल्याचे दिसून येत आहे. तालुकाप्रमुखांच्या इशाराऱ्यानंतरही सदस्या अनुजा चव्हाण कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे. 

हे पण वाचासध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केली तर... खासदार संभाजी राजेंचा सरकारला इशारा  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiplun taluka ledar prataprao shinde clarification on fraud