पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून केला साजरा

All India Student Federation celebrate pm modi birthday as unemployment day NationalUnemploymentDay
All India Student Federation celebrate pm modi birthday as unemployment day NationalUnemploymentDay

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस ऑल इंडिया स्टूडंट फेडरेशनकडून बेरोजगार दिन (#NationalUnemploymentDay)म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी भीक मांगो आंदोलन करत केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करण्यात आली. देशात बेरोजगारीचे संकट वाढत असताना मोदी सरकारने खासगीकरण सुरू केले आहे. कोरोनामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. हे संकट कायम राहिल्यास बेरोजगार तरुण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फेडरेशनने दिला.

दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत विराजमान झाले. पण उलट देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणून वीस कोटी रोजगार त्यांनी तरुणांकडून हिरावून घेतले. त्यामुळे मोदींचा प्रतीकात्मक पद्धतीने वाढदिवस देशभरातले तरुण राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करत आहेत. 

यावेळी बोलताना गिरीश फोंडे म्हणाले, " रेल्वे, एलआयसी, बीएसएनएल, एअर इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम अशा सार्वजनिक कंपन्या विकून पंतप्रधान देशाची मालमत्ता विकत आहेत पण तेथील रोजगार देखील संपवत आहे. या रोजगारा बरोबरच घटनेने दिलेल्या आरक्षणाच्या जागा देखील संपत आहेत. 20 कोटी बेरोजगार झालेल्या तरुणांना रोजगार देऊन व बेरोजगारांना बेरोजगार भत्ता द्यावा अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा.'

प्रशांत आंबी म्हणाले,  कोरोना काळात असंघटित क्षेत्रातील अनेक लोकांचा गावी परतताना मृत्यू झाला. परंतुस याची आकडेवारी देखील सरकारकडे नाही. तसेच कार्यकर्त्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हॅपी बर्थ डे टू यु असे गाणे देखील तरुणांनी गायले. 

यावेळी आरती रेडेकर, धीरज कठारे, रजत शेख, संदेश माने, संतोष आंबेकर, केदार तहसीलदार, सुनील कोळी, प्रशांत वाघोळे, निलेश गरड, अमोल देवडकर, आकाश कांबळे,सौरभ माने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.  

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com