
Maharashtra Road Accident: रत्नागिरीत चिपळूण जवळ भीषण अपघात झालाय. थारने रिक्षाला उडवल्यानं पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय. सोमवारी कराड-चिपळूण मार्गावर पिंपळी इथं हा अपघात झाला. मृतांमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.