ओबीसी आरक्षणबाबत चित्रा वाघ आज सिंधुदुर्गात

ओबीसी आरक्षणबाबत चित्रा वाघ आज सिंधुदुर्गात

कुडाळ (सिंधुदुर्ग) : भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अॅड. अशिष शेलार यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यामध्ये ४०० ऑक्सिमीटर व २५ हजार मास्कचे वाटप बुधवारी (ता.२३) करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत भाजपचे नेते अतुल काळसेकर यांनी दिली. आज (ता. २२) महिला नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) या ओबीसी आरक्षणबाबत (obc reservation) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, असे त्यांनी सांगितले. काळसेकर यांनी आज येथील हॉटेल स्पाइस कोंकणमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत होते. chitra-wagh-in-sindhudurg-today-regarding-obc-reservation-kokan-marathi-news

ते म्हणाले, ‘‘ जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे संकट आहे. जिल्ह्यात ग्रामीण विलगीकरण कक्षात जवळपास ३ हजार ५०० पेक्षा कोविड रुग्ण आहेत. या कालावधीत खासदार नारायण राणे, खासदार मनोज कोटक, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, अतुल भातखळकर, यांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार हे बुधवारी (ता.२३) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सौजन्याने ४०० ऑक्सिमीटर व २५ हजार मास्क वाटप कुडाळ तालुक्यातील बांव बांबुळी व पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या पिंगुळी एकांत रिसॉर्टमध्ये करण्यात येणार आहे. मालवण तालुक्यामध्ये दुपारी ३ वाजता हडी ग्रामपंचायत, ४ वाजता चिंदर व ५ वाजता आचरा कोविडसेंटर येथे वितरण केले जाणार आहे. उर्वरित साहित्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे.’’

आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

मराठा आरक्षण प्रश्नाबरोबरच आता ओबीसी आरक्षण विषय ऐरणीवर आला आहे. राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबतच उद्या (ता.२२) पक्षाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत ओबीसी अंतर्गत समाज संघटना व पक्षाचे पदाधिकाऱ्यांची प्रमुख बैठक एमआयडीसी विश्रामगृहावर होणार आहे. आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या आरक्षणाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे सध्याचे महाविकास आघाडी सरकार आरक्षण विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पक्षाचे पदाधिकारी प्रभाकर सावंत, राजू राऊळ, दादा साईल, विनायक राणे, अविनाश पराडकर, बंड्या सावंत, मोहन सावंत, दीपक नारकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, राजा धुरी, राकेश कांदे, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com