चित्ररेखा जाधव यांना राज्यस्तरीय " टिचर इनोव्हेशन अॅवॉर्ड"

pali
pali

पाली - पेण तालुक्यातील राजिप शाळा आमटेमच्या उपक्रमशिल शिक्षीका चित्ररेखा रविंद्र जाधव यांना नुकताच "टीचर इनोव्हेशन अॅवार्ड" हा पुरस्कार मिळाला. स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (सर), सोलापुर यांच्या वतीने हा पुरस्कार अक्कलकोट (सोलापुर) येथे झालेल्या परिषदेत त्यांना प्रदान केला गेला.

स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन सोलापूर, रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था वेळापूर -सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट येथे नुकतेच नॅशनल लेव्हल एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फर्न्स आयोजित करण्यात आली होती. या कॉन्फर्न्स मध्ये चित्ररेखा जाधव यांच्या हसत खेळत पर्यावरण शिक्षण या नवोपक्रमास हा राज्यस्तरीय सर फाऊंडेशन अॅवॉर्ड मिळाला. यावेळी जाधव यांनी त्यांच्या नवोपक्रमाचे सादरीकरण राष्ट्रीय परिषदेत केले. त्यांच्या नवोपक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे उद्घाटन शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक मान्यवर व उपक्रमशिल शिक्षक उपस्थित होते.

चित्ररेखा जाधव यांनी आपल्या हसत खेळत पर्यावरण शिक्षण या नवोपक्रमात वर्षभर सहकार्यांसह पर्यावरण स्नेही उपक्रम केले. त्यामध्ये वृक्ष रक्षाबंधन, आषाढी एकादशीला वृक्ष दिंडी, वृक्ष संगोपन प्रबोधन, फटाके मुक्तदिवाळी अभियान हे उपक्रम होते. सलग सहा वर्ष या शाळेत राबविलेल्या फटाकेमुक्त दिवाळी अभियानामुळे मुलांनी फटाके फोडले नाहीत. त्यामुळे लाखो रुपयांची बचत झाली. यातून से नो टू प्लास्टिक या अभियानातून शाळेत कापडी कागदी पिशव्या तयार केल्या. त्यांचे गावाच्या आठवडा बाजारात मोफत वापट केले. तसेच प्लास्टीक विरोध प्रबोधन केले. त्याबरोबरच जलसंवर्धन पथनाट्य सादरीकरण, जलदिंडी, इकोफ्रेंडली गणेश उत्सव, निर्माल्य संकलन व खत तयार करणे, कचर्याची होळी, नैसर्गिक रंग वापर या सर्व विषयावर निबंध सुवचन लेखन सादरीकरण व त्यातून पर्यावरण जागृतीचा संवर्धन संदेश असे नवोपक्रम केले.

जिल्हा परिषद आमटेम शाळेच्या संपूर्ण टिमचे हे यश राज्यभर पोहचले आहे. ही परिषद खुपच गुणवत्तापूर्ण होती. या नवउर्जा देणार्या प्रेरणादायी सोहळ्यातून खुप काही गोष्टी मिळाल्या. भविष्यात अजुनही अनेक नवोपक्रम करण्याचा मानस आहे.
चित्ररेखा रविंद्र जाधव, नवोपक्रमशिल शिक्षीका, राजिप शाळा आमटेम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com