'महाराष्ट्र निसर्ग उद्यानच्या' ऑनलाईन छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

birds online Exhibition

ऑनलाईन छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

माणगाव : रायगड जिल्ह्यातील पक्षी वैभव वन्यप्रेमींसाठी आस्थेचा विषय ठरलेला आहे. ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ या संस्थेने हीच बाब हेरून पक्षी सप्ताहानिमित्त हे वैभव जगभर पोचवण्यासाठी ऑनलाईन ई-छायाचित्र प्रदर्शन भरवले. यामध्ये वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनू कुवेसकर यांनी टिपलेल्या १०० प्रजातीच्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. प्रदर्शनास पहिल्याच दिवशी दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हेही वाचा: माजी मंत्र्यांची जीभ घसरली; रागाच्या भरात शेतकऱ्याला दिली शिवी

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन आणि डॉ. सलीम अली यांच्या जयंतीच्या निमित्ताने ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत दरवर्षी ‘पक्षी सप्ताह’ साजरा केला जातो. गेल्या वर्षी ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’तर्फे उद्यानात आढळून येणाऱ्या पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे या वर्षी ‘रायगड जिल्ह्यातील समृद्ध पक्षी वैभव’ या विषयावर ई-छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे, असे महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे संचालक तुषार शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा: 'आर्यनला अडकवण्याचा कट, गोसावीने 50 लाख ॲडव्हान्सही घेतले'

या ई-छायाचित्र प्रदर्शनातील १०० छायाचित्रे मुख्यतः माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, रोहा, तळा, अलिबाग परिसरात शंतनू कुवेसकर यांनी टिपलेली आहेत. कुवेसकर गेली १५ वर्षे शालेय जीवनापासून पर्यावरण क्षेत्रात रायगड जिल्ह्यात कार्यरत असून येथील तरुणांमध्ये व जंगल परिसरातील खेड्यापाड्यांत राहणाऱ्या नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन होण्यासाठी जनजागृतीपर काम करत असतात.

"रायगड जिल्ह्यातील समृद्ध पक्षी वैभवाची माहिती महाराष्ट्रात, जगभर पोचवण्यासाठी प्रदर्शनाचा उपक्रम आहे. समृद्ध अशा नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन होण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास वाटतो. यासाठी महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचा मी आभारी आहे."

- शंतनू कुवेसकर

Web Title: Citizens Response Birds Online Photo Exhibition Maharashtra Nature Park

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raigadbirdsexhibition