नागरिकांची बदनामी करू नये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

मालवण : "भंडारी हायस्कूलने नैसर्गिक वाहणाऱ्या पाण्याचा मार्ग बंद केल्याने पाणी आजूबाजूच्या परिसरात तुंबले. परिणामी काही घरांच्या भिंती मातीच्या असल्याने धोका निर्माण झाला आहे. याची माहिती पालिका प्रशासनास दिल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक वाहणाऱ्या पाण्याचा मार्ग खुला करून दिला. त्यामुळे अनेक घरांचा धोका टळला आहे. आम्ही पालिका कर्मचारी आणि प्रशासनाचे आभार मानत आहोत. भंडारी हायस्कूल प्रशासनाने नाहक शाळा परिसरातील नागरिकांची बदनामी करू नये,‘ असा इशारा नागरिकांच्या बैठकीत देण्यात आला.

बाजारपेठ येथील संतसेना मार्गावरील नागरिकांची बैठक काल (ता. 24) सायंकाळी श्री भैरवी मंदिरात झाली. या वेळी नागरिकांनी भंडारी हायस्कूल प्रशासनाच्या वतीने पोलिसांकडे पालिका कर्मचाऱ्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीबद्दलची माहिती तालुका नाभिक संघाचे तालुकाध्यक्ष विजय चव्हाण यांनी पत्रकातून दिली.
आम्ही गेली 50 वर्षे संतसेना मशिदगल्ली या भागात राहतो. आमची 50 ते 60 घरे या भागात वास्तव्यास आहेत. आरोग्याला अपायकारक किंवा धोकादायक असे कधीच काही घडले नाही. आमची मुले भंडारी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत; परंतु त्यांच्या कधीही आरोग्यास धोका निर्माण झाला नाही. मात्र गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील पेडणेकर यांच्या घराला धोका निर्माण झाला. पालिकेने याची गंभीर दखल घेत तत्काळ पथकामार्फत पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक मार्ग मोकळा करून दिला. केवळ भंडारी हायस्कूलच्या मुख्याध्यापक व समितीच्या लोकांनी खोटी माहिती देत पालकांची व जनतेची दिशाभूल करत फसवणूक केली आहे. भंडारी हायस्कूलने परिसरातील नागरिकांची बदनामी करू नये, असा इशाराही या वेळी नागरिकांनी दिला.

Web Title: Citizens should not be defamation