

Konkan Class 10 Copying Case
esakal
ओरोस: दहावीच्या परीक्षेत शिक्षकाने विद्यार्थ्याचा पेपर लिहिल्याच्या प्रकरणात अडकलेल्या शिक्षकाच्या चौकशीचा जाब शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला विचारल्याने संतप्त झालेल्या संबंधित अधिकाऱ्याने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांना सभेचे कामकाज सुरू असतानाच ‘मी आत्महत्या करणार’ असा मेसेज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार आज जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत समोर आला. संबंधित अधिकारी सभागृहातून निघून गेल्याने सदस्य आक्रमक झाले. ‘अशा अधिकाऱ्याची आम्हाला गरज नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, ’ अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली.