पेण सुधागड रोहा मतदारसंघात महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचा प्रारंभ

pali
pali

पाली - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.2) भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालीत साफसफाई केली. यावेळी जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.

भा.ज.पाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर ते 30 जानेवारी 2019 या चार महिण्याच्या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 150 किलोमिटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी (ता.2) पासून करण्यात आला. पाली बल्लाळेश्वर मंदीरापासून गणरायाचे दर्शन घेवून प्रथमता पेण सुधागड रोहा मतदारसंघात स्वच्छता सेवा पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी म. गांधी यांच्या प्रतिमेची गाडीतून मिरणुक काढण्यात आली. तसेच भजने व देशभक्तीपर गीत लावण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः हातात खराट, टोपली घेवून ठिकठिकाणचा कचरा झाडून स्वच्छता करीत होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसर, रामआळी, शिवाजी चौक मार्गे जुने बसस्टॅन्ड, भोईआळी ते एस.टी.स्टॅन्ड परिसर स्वच्छ करण्यात आला. दुपारी 1 वाजता मराठा समाज हॉल पाली येथे समारोप कार्यक्रम पार पडला. पाली ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचार्‍यांनी देखील यावेळी मेहनत घेतली. या पदयात्रेदरम्यान भारतीय जनता पार्टीने चार वर्षात केलेल्या विकासकामांची माहीती देणारे पत्रके वाटण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना विष्णु पाटील म्हणाले की म. गांधींची जयंती ते पुण्यतिथी दरम्यान स्वच्छ भारत अभियानाला जोड कार्यक्रम म्हणून म. गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून घेतल्यास व पटवून दिल्यास सशक्त व निरोगी राष्ट्र निर्माण झालेले दिसेल. जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील म्हणाले की  म. गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेद्वारा स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याबरोबरच स्वच्छतेचा कृतीशिल कार्यक्रम राबविला जात असून जनतेचा या उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग मिळत आहे. भाजप सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राउत म्हणाले की म. गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेद्वारे त्यांच्या विचारांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात आहे. पेण सुधागड मतदारसंघात भा.ज.पा नेते विष्णु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 150 कि.मि. परिसरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच शासनाच्या जनहितार्थ व लोकोपयोगी योजनांची माहिती लाभार्थी घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे राउत यांनी सांगितले. 
     
म. गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेत भाजप जिल्हा सरचिटणिस विष्णु पाटील व सुनिल दांडेकर, भाजप प्रवक्ते मिलिंद पाटील, सुधागड तालुका भाजप अध्यक्ष राजेंद्र राउत, रायगड जिल्हा भा.ज.पा चिटणिस बंडू खंडागळे, महाराष्ट्र प्रदेश सदस्य संजय कोणकर, पेण तालुका भाजप अध्यक्ष गंगाधर पाटील, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय धारीया, चंद्रकांत (दादा) घोसाळकर, सुधागड तालुका सरचिटणिस आलाप मेहता, शिरिष सकपाळ, अडुळसे सरपंच भाऊ कोकरे, आतोणे सरपंच रोहन दगडे, रोहा तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे, डॉ. के.पी. जोशी, अजय खंडागळे, पाली शहर अध्यक्ष वासुदेव मराठे, जितेंद्र केळकर, रायगड जिल्हा शिक्षक सेल अध्यक्ष हिरामण कोकाटे आदिंसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com