

आगामी निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळे लढणार.
esakal
Minister Nitesh Rane : भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीऐवजी मैत्रिपूर्ण लढविल्या जातील, असे जाहीर केल्याने जिल्ह्यात आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षांकडे नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पुरेसे उमेदवार आहेत. त्यामुळे महायुती करून बंडखोरीला प्राधान्य आणि विरोधी पक्षाला बळ देण्यापेक्षा जिल्ह्यात आगामी निवडणुका महायुती म्हणून लढल्या जाणार नाहीत, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे स्पष्ट केले.