

Ratnagiri CNG Shortage During Ganeshotsav Long Queues in Chiplun Sangameshwar Trouble Auto Drivers and Returning Devotees
sakal
रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या सणासाठी लाडक्या गणरायाच्या आगमनानिमित्त लाखो चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून उत्साहाने आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत; मात्र कोकणात पाऊल ठेवताच गावी परतणाऱ्या चाकरमान्यांच्या या आनंदावर सीएनजी (CNG) तुटवड्यामुळे मोठे विरजण पडत आहे. महामार्गावरील बहुतांश पंपांवर गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना तासनतास लांबच लांब रांगेत ताटकळत राहावे लागत आहे.