esakal | चिपी विमानतळाची संसदीय समितीकडून पाहणी; अहवाल संसदेला देणार

बोलून बातमी शोधा

the committee check report of chipi airport in sindhudurg report submit}

जिल्ह्यात चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी संसदीय अंदाज समिती दाखल झाली.

चिपी विमानतळाची संसदीय समितीकडून पाहणी; अहवाल संसदेला देणार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : चिपी येथील विमानतळाची काल संसदीय अंदाज समितीने पाहणी केली. या विमानतळाला अद्याप डायरेक्‍टडेड जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशनची (डीजीसीआय) परवानगी मिळालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर समिती आपला अहवाल संसदेला सादर करणार आहे.

जिल्ह्यात चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी संसदीय अंदाज समिती दाखल झाली. खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विमानतळाची पाहणी करतानाच विमानतळ बांधकाम कंपनी आयआरबीचे अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. समितीमध्ये बापट यांच्यासह ‘डीजीसीआय’चे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत, खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे.

हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; शिवशाहीची टेम्पोला धडक -

विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना तेथील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश होते. अद्यापही विमानतळाचा संलग्न रस्ता झालेला नाही. विमानतळासाठी पुरेशी विद्युत जोडणीदेखील नाही. पाणीपुरवठ्याचे कामदेखील अपूर्ण आहे. 
या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारकडून विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते; परंतु या विमानतळाच्या अन्य कामांसोबतच धावपट्टीची दुरुस्तीदेखील बाकी आहे. त्यामुळे डीजीसीआयने उड्डाणांसाठी परवानगी दिलेली नाही.

या विमानतळावरून उड्डाणासाठी अलायन्स एअरलाइन कंपनी पुढे आली आहे. या कंपनीचा तिकीट काउंटरदेखील विमानतळावर सुरू झाला आहे. अन्य काही कंपन्या या विमानतळावरून हवाई वाहतूक करायला इच्छुक असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर ही समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार आहे.

संपादन - स्नेहल कदम