esakal | कोकण : प्रत्येक ग्रामस्थांशी संवाद ; 10 गावात उद्यापासून सरपंच आपल्या दारी
sakal

बोलून बातमी शोधा

communication with village people in konkan activity 'sarpanch aplya dari'

उमराठ गावातील दहा वाड्यांमध्ये दहा दिवसात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

कोकण : प्रत्येक ग्रामस्थांशी संवाद ; 10 गावात उद्यापासून सरपंच आपल्या दारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर, उपसरपंच सुरज अरुण घाडे व सदस्य यांनी सरपंच आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून (2) उमराठ गावातील दहा वाड्यांमध्ये दहा दिवसात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

उमराठ गावातील ग्रामस्थांच्या समस्या, विकासकामे, शासकीय योजना, महिला बचत गटात सक्रीय सहभाग, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा परिचय होणे, विकासकामे, गावातील समस्या व सोयी-सुविधांचा अभाव आदीबाबत ग्रामस्थांच्या सूचना स्वीकारणे, ग्रामस्थांशी चर्चा करणे व मार्गदर्शन करणे, आपला गाव आदर्श गाव ही संकल्पना पूर्ण करणे अशी उद्दिष्टे या उपक्रमामागे आहेत. 

हेही वाचा - दरवाजावर दरबानसारखे नमस्कार करायला उभे राहणाऱ्या वैभव नाईक यांना बॉडीगार्डनेच केले बाजूला -

2 ते 15 मार्च 2021 या कालावधीत दहा दिवस ( काही दिवस वगळून ) उमराठ गावातील प्रत्येक वाडीत सदिच्छा भेटीतून सरपंच आपल्या दारी हा उपक्रम राबविला जाणार आहे. 2 मार्चला मराठवाडी, 3 ला घाडेवाडी, 4 ला गोरिवलेवाडी, 5 ला धारवाडी, 6 ला धनावडेवाडी, 7 ला बौद्धवाडी, 8 ला जालगावकरवाडी, 10 ला आंबेकरवाडी व 15 ला डागवाडी व कोंडवीवाडी असा सदिच्छा वाडीभेटीचा कार्यक्रम आहे. महिलांना बचत गटात सक्रिय सहभागाबाबत प्रोत्साहन देणे व सक्षम बनविणे, ग्रामपंचायतीतर्फे शासकीय योजनांतून लघुउद्योग निर्माण करणेबाबत मार्गदर्शन व सूचना स्वीकारणे, वाड्यांमध्ये मूलभूत गरजा व सोयीसुविधा पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

"ग्रामपंचायत क्षेत्रातील वाड्या सक्षम व समृद्ध होणेबाबत मार्गदर्शन व अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे, असे हेतू या उपक्रमाचे आहेत." 

- जनार्दन आंबेकर, सरपंच 

संपादन - स्नेहल कदम 
 

loading image