मागील पाच वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाले असले तरी मृत्यू झाल्याची घटना एकही नाही.
चिपळूण : कधी बिबट्याने तर कधी रानगव्याने हल्ला केल्याच्या घटना जिल्ह्यात अधूनमधून घडत आहेत. या अनुषंगाने आता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबास देण्यात येणाऱ्या भरपाई रकमेत वाढ केली आहे. या रक्कमेत आता २५ लाखांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात चिपळूण, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी हद्दीत आठजण गंभीर जखमी झाले आहेत; मात्र मृत्यूची घटना एकही घडलेली नाही.