सावंतवाडी रूग्णालयात अस्वच्छतेवरून काँग्रेस आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

सावंतवाडी - येथील उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत जाब विचारत आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रूग्णालयाचे अधीक्षक उत्तम पाटील यांना घेराओ घातला. यावेळी व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळता येत नसेल तर घरी बसा, असे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खडेबोल सुनावले. जिल्हा शल्य चिकित्सक भेटीसाठी आल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली. 

सावंतवाडी - येथील उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत जाब विचारत आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रूग्णालयाचे अधीक्षक उत्तम पाटील यांना घेराओ घातला. यावेळी व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळता येत नसेल तर घरी बसा, असे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खडेबोल सुनावले. जिल्हा शल्य चिकित्सक भेटीसाठी आल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली. 

कॉंगेस तालुकाध्यक्ष रविंद्र म्हापसेकर, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष बाबल्या दुभाषी, प्रेमानंद देसाई, आबा सावंत, संतोष जोईल, विभावरी सुकी, संजय राऊळ, अभय मालवणकर, सखाराम शेटकर, तौकिर शेख, संतोष कासकर, साहिल सांगेलकर, रघुवीर देऊलकर आदी उपस्थित होते. 

रुग्णांना 5 दिवस पाणी नाही, बेडशीट नाही, स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. 3 महिन्यापासून रुग्णालयात अस्वच्छता आहे. आपली अधीक्षक म्हणून जबाबदारी काय ? रुग्ण घेणे बंद करा.'' याबाबत वरिष्ठ स्तरावर कल्पना दिली असून, त्यांच्या कार्यवाहीशिवाय आपण काही करु शकत नसल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. यावेळी यावर आपण किती माहिती दिली हे कारण न सांगता शासन आणि तुम्ही कशी स्वच्छता करुन घेता येईल ते पहावे,

- रविंद्र म्हापसेकर

सौ. सुकी यांनी अशा ठिकाणी गरोदर बाई किंवा गंभीर रुग्ण आला तर उलट आणखीच आजारी पडेल. याकडे जबाबदारी म्हणून दक्षता समितीने लक्ष का दिले नाही, असे विचारले. सांगेलकर यांनी यापूर्वीही अशाच समस्या निर्माण झाल्या होत्या. 3 सफाई कामगार असणे हे कारण नसून स्वच्छता कशी करुन घ्यावी, ही जबाबदारी आपली आहे. असे सांगितले.

यावेळी अधीक्षक पाटील यांनी दक्षता समितीकडे वर्षाला स्वच्छता व इतर सामानासाठी एक ते दिड लाख रुपये निधी येतो, तो ही अपुरा असतो. वरिष्ठ स्तरावरुन कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. तशी आपण मागणी केली आहे. असे सांगितले. यावर वरिष्ठ स्तरावरुन सेवा देत नसेल तर आपण रजेवर जावा किंवा आपली जबाबदारी नाही म्हणून लेखी द्या, अशी आक्रमक भूमिका कॉंग्रेस शिष्टमंडळाने मांडली. 

शल्य चिकित्सक भेटीसाठी तयार 
यावेळी अधीक्षक पाटील यांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकुरकर यांना संपर्क साधण्याची मागणी केली. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात 3 महिन्यापासून स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर असून, इतर समस्यांचा पाढा वाचला. श्री. चाचुरकर यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चेची तयारी दर्शविल्याने आंदोलकांनी माघार घेतली. 

Web Title: Congress aggressor on unhealthy Sawantwadi hospital