काँग्रेस `या` जनतेच्या प्रश्नांसाठी लोकअदालत घेऊन आंदोलन छेडणार 

Congress Agitation For Mumbai Goa Highway Peoples Question
Congress Agitation For Mumbai Goa Highway Peoples Question

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - मुंबई - गोवा महामार्गावरील जनतेच्या विविध प्रश्‍नासंदर्भात शासनाला व ठेकेदार कंपनीला जाग आणण्यासाठी जिल्हा कॉंग्रेस जिल्हाभरात लोकअदालत घेऊन आंदोलन छेडणार आहे. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असुन प्रसंगी याबाबत मंत्र्याचेही लक्ष वेधणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. 

जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, जेष्ठ नेते ऍड. दिलीप नार्वेकर, समीर वंजारी आदी उपस्थित होते.

श्री. गावडे म्हणाले, "" गेल्या चार वर्षांमध्ये महामार्गाच्या कामाबाबत कॉंग्रेसकडून ठेकेदार कंपनीला तसेच प्रशासकीय यंत्रणेला कुठलाही प्रकारचा त्रास दिला गेला नाही; मात्र आता कॉंग्रेस गप्प राहणार नसून जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहे. ठेकेदार कंपनी माणसाला माणसं म्हणून पाहत नाही तर त्याला वरून पाहत आहे. कारण आजपर्यंत महामार्गावर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.'' 

जिल्हा सरचिटणीस जैतापकर म्हणाले, "" महामार्गाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. साईटपट्टीवर दलदल निर्माण झाली आहे. विविध प्रश्‍नांवर कॉंग्रेस आक्रमकपणे उतरणार आहे. झाराप ते खारेपाटण याठिकाणी जनतेची निवेदने स्विकारुन व जनतेला सोबत घेऊन संबंधित कंपनीच्या अधिकारी व प्रशासकीय यंत्रणेला जाब विचारणार आहोत.'' 

यावेळी नूतन कार्यकारिणी निवडीनंतर येथील माजी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर व कणकवलीचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत यांनी आपल्याला दिलेले पद मान्य नाही, असे स्पष्ट केले तसेच नाराजी व्यक्त केली होती.

याबाबत जिल्हाध्यक्ष गावडे यांना विचारले असता ते म्हणाले, ""कॉंग्रेस पक्षात संघटनेला महत्त्व आहे. याठिकाणी रिमोटवर काही चालत नाही. त्यामुळे पक्षाचा आदेश सर्वांनाच मानावा लागेल. सर्वाना विश्वासात घेऊन कार्यकारिणी बनविण्यात आली आहे. शिवाय प्रदेश कॉंग्रेसच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी आहे. पक्षात बोलायला सर्वाना अधिकार आहे ज्यांना बोलायचे आहे ते बोलू शकतात; पण आज कुठलाही वाद पक्षात नाही. कोणीही एकाच पदावर चिकटून बसणे योग्य नाही. सर्वांना संधी मिळाली पाहिजे. कोणाला काम करायचे नसल्यास नको करू दे; पण येत्या सहा महिन्यात पक्ष उभारी घेणार असुन सर्वजण एकत्र येऊन काम करणार आहोत.'' 

महिला कार्यकारिणी नेमणार 

कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनीही कॉंग्रेसची जिल्हाची महिला कार्यकरणी नेमण्यात येणार असुन जे कार्यरत आहेत त्यांना संधी देण्याबरोबरच जे काम करण्यास इच्छुक आहेत त्यांना या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात येणार असल्याचे सांगितले. लवकरच ही कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com