कॉंग्रेसची संगमेश्‍वरमध्ये स्वबळासाठी चाचपणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

देवरूख - जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी कॉंग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. तालुक्‍यातील 7 गट आणि 14 गणातून इच्छुक उमेदवारांची यादी कॉंग्रेसने तयार केली आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रिक्‍त असलेले तालुकाध्यक्षपद भरण्यात आले आहे. तसेच कॉंग्रेसने पार्लमेंटरी बोर्डही स्थापन केले आहे. तालुक्‍यात तयार झालेल्या सातही जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली आहे. यामध्ये धामापूरतर्फे संगमेश्‍वर गटातून दत्ता परकर, कडवईतून रोशन सुर्वे, कसबा गटातून दिलीप मोहिते, नावडीतून शीतल सुर्वे, कोसुंब गटातून दीपक सावंत, ओझरे खुर्दमधून सौ.

देवरूख - जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी कॉंग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. तालुक्‍यातील 7 गट आणि 14 गणातून इच्छुक उमेदवारांची यादी कॉंग्रेसने तयार केली आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रिक्‍त असलेले तालुकाध्यक्षपद भरण्यात आले आहे. तसेच कॉंग्रेसने पार्लमेंटरी बोर्डही स्थापन केले आहे. तालुक्‍यात तयार झालेल्या सातही जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली आहे. यामध्ये धामापूरतर्फे संगमेश्‍वर गटातून दत्ता परकर, कडवईतून रोशन सुर्वे, कसबा गटातून दिलीप मोहिते, नावडीतून शीतल सुर्वे, कोसुंब गटातून दीपक सावंत, ओझरे खुर्दमधून सौ. गोताड यांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. दाभोळे गटातून उमेदवार निवडीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 14 पंचायत समिती गणांमध्ये आरवलीतून नेहा नेने, चांदबिबी शेकासन, धामापूरतर्फे संगमेश्‍वरमधून बाबू डेरे, अर्जुन गोताड, कडवईतून अमिता कडवईकर, धामणीतून सुनील पवार, सत्यवान विचारे, बाळू होडे, संदेश कुवळेकर, आसिफ काझी, कसब्यातून सौ. श्रद्धा कुवळेकर, मंदाकिनी जाधव, फुणगूसमधून सौ. मुल्ला, मुचरीतून समीर खामकर, निवे बुद्रूकमधून अंजली यादव, सलोनी शरद रसाळ, मोर्डेतून सौ. वाजे, दाभोळेतून गंगाराम जाधव, कोंडगावमधून मुरलीधर बाईंग, काका शेट्ये यांचे अर्ज कमिटीकडे आले आहेत. कोसुंब आणि कुरधुंडा गणातून उमेदवार निवडीचे काम सुरू असल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले. कॉंग्रेसने सर्व गट आणि गणात अशी तयारी केल्याने आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

अंतिम बैठक रविवारी... 
आगामी निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी संगमेश्‍वर तालुका कॉंग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक 18 डिसेंबरला नूतन तालुकाध्यक्ष सुनील सुर्वे यांच्या संगमेश्‍वरमधील निवासस्थानी बोलाविण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार तसेच सर्व पदाधिकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Congress on its own evaluation of the Sangameshwar