esakal | कांदा निर्यात बंदीचा कॉंग्रेसकडून निषेध 
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Protests Ban On Onion Exports

जगभरात लॉकडाउन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव आल्याचे दिसत आहे. चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण केंद्रातील मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी जाहीर केली.

कांदा निर्यात बंदीचा कॉंग्रेसकडून निषेध 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कांदा निर्यातीबाबतचा निर्णय तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आज केंद्रातील भाजप सरकार विरोधात जिल्हा कॉंग्रेसने घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. 

जगभरात लॉकडाउन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव आल्याचे दिसत आहे. चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण केंद्रातील मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी जाहीर केली. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला. चार जून 2020 रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती.

तीन महिन्यांत घुमजाव करत निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला. या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा उत्पादन शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आज कॉंग्रेसने आंदोलन केले.

आमच्या तीव्र भावना केंद्र सरकारकडे कळविण्यात याव्यात, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे कॉंग्रेस शिष्टमंडळाने केली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, अशोक जाधव, अशोक वाडेकर, दीपक राऊत, कपिल नागवेकर, श्री. काझी आदी उपस्थित होते. 

loading image