

Congress district president Irshad Sheikh outlining the party’s development-focused strategy for the upcoming Vengurla elections.
Sakal
वेंगुर्ले: शहरातील नागरिकांचा विकास हा केंद्रबिंदू धरून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. फक्त ठेकेदारांचा विकास हे आमचे व्हिजन नाही. वेंगुर्लेवासीयांच्या मनातले वेंगुर्ले शहर वसवण्याचे आमचे प्रयत्न राहतील. टाटा कन्सल्टन्सी ज्याप्रमाणे सुविधा देते, त्याप्रमाणे विकासाचा आराखडा आम्ही तयार करू. यामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विलास गावडे यांच्यासहित सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी येथे व्यक्त केला.