गोव्याशी असलेले कनेक्शन पुन्हा एकदा उघड ;  आरोंद्यात  दोघे ताब्यात

भूषण आरोसकर
Monday, 22 February 2021

गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा तसेच दारू व इतर अमली पदार्थ सोप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात चोरट्या वाहतुकीने सिंधुदुर्ग मार्ग राज्यभरात पोहोचल्या जातात.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना आरोंदा येथे ताब्यात घेण्यात यश आले आहे. ही कारवाई येथील पोलिसांकडुन आरोंदा दुरक्षेत्रावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून मोटार कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत मुबारक इस्माईल खतीब (वय ५४) रा. कोल्हापूर शिवाजी पार्क, सलीम शरपुद्दीन कापडी रा. कोल्हापूर (वय ५२), अशी त्या दोघांची नावे आहेत.

गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा तसेच दारू व इतर अमली पदार्थ सोप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात चोरट्या वाहतुकीने सिंधुदुर्ग मार्ग राज्यभरात पोहोचल्या जातात. सर्रास दारू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सातार्डा, आरोंदा व बांदा चेक पोस्टवर दारूवर कारवाई करत दारू वाहतूक करणारे ताब्यात घेत कारवाई करण्यात येते. 

हेही वाचा- कर्नाटकात प्रवेश बंद ! 72 तासाच्या आतील  कोविड निगेटिव्ह रिपोर्टची मागणी; सीमेवरून वाहने परत

काल रात्रीच्या वेळी अचानक गांजावर करण्यात आलेल्या कारवाईने चोरट्या गांजा वाहतूकीने अमली पदार्थाचे गोव्याशी असलेले कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. काल रात्री ताब्यात घेण्यात घेतलेल्या दोघांकडुन गांजा जप्त करण्यात आला असून यात ४३० मिली ग्रॅम वजनाचा जप्त करण्यात आलेला गांजा आहे.  याबाबत हवालदार विजय केरकर यांनी तक्रार दिली असून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: connection with Goa is revealed once again Both are in custody crime marathi news konkan