कोरोना लशीची आज रंगीत तालीम ; रत्नागिरीत तीन ठिकाणी नियोजन 

corona lachis colorful rehearsal in ratnagiri
corona lachis colorful rehearsal in ratnagiri

रत्नागिरी - कोरोनावरील लस येऊ घातली आहे. त्याची रंगीत तालीम उद्या (ता. 8) जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी चारपर्यंत ही तालीम असणार आहे. त्यासाठी पाचजणांची व्हॅक्‍सिनेशन टीम तयार केली आहे. 25 लाभार्थी निश्‍चित केले असून त्याची माहिती शासनाला दिली आहे. 28 दिवसांच्या अंतरावर या लसीचे 2 डोस दिले जाणार आहे; मात्र ती सक्तीची नाही. 13 जानेवारीपर्यंत जिल्ह्याला लस मिळण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले व निवासी शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत शेरखाने यांनी दिली. 

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""जिल्हा शासकीय रुग्णालय, हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दापोली उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 वरील लसीची रंगीत तालीम होणार आहे. निवडणूक केंद्रावर जसे अधिकारी नेमले जातात तशी व्हॅक्‍सिनेशन टीम तयार करण्यात आली आहे. लस देणारा व्हॅक्‍सिनेटर ऑफिसर असले तरी उर्वरित चार व्हॅक्‍सिनेशन ऑफिसर असतील. लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची डमी टीम तयार केली आहे. त्यासाठी स्पेशल रूम तयार केली आहे. आरोग्य संचालनाला दिलेल्या यादीची खात्री करूनच रुग्णाला तेथे प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या रुममध्ये त्याचे तापमान व इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. दुसऱ्या रुममध्ये कागदपत्रांची छाननी होईल नंतर तिसऱ्या रुममध्ये लाभार्थ्याला लस दिली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यावर काही परिणाम होतोय की नाही, याची शहानिशा करून काही वेळाने सोडले जाणार आहे. मास्क वापरणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळायचेच आहेत. 28 दिवसांनी त्याला दुसरा डोस दिला जाणार आहे. सुमारे 0.5 एमएमचा हा डोस असून दंडामध्ये तो दिला जाणार आहे. ही फक्त रंगीत तालीम आहे. प्रत्यक्षात लस दिली जाणार नाही मात्र आम्ही त्यासाठी तयार आहे. 

 
लस ऐच्छिक आणि मोफत 
पहिल्या टप्प्यात 14 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. दिवसाला 100 लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलिस, महसूल, पत्रकारांना ही लस दिली जाईल. त्यानंतर 50 ते 60 वर्षाच्या व्यक्तींना लस दिली जाईल. नंतर 50 च्या खालील वयोगटांतील लोकांना ही लस देण्यात येणार आहे; मात्र कर्करोग, एचआयव्ही बाधितांना ती दिली जाणार नाही, असे डॉ. फुले यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com