esakal | 'चाचणी, लसीकरणाला विरोध कराल तर गुन्हे दाखल करणार'
sakal

बोलून बातमी शोधा

'चाचणी, लसीकरणाला विरोध कराल तर गुन्हे दाखल करणार'

'चाचणी, लसीकरणाला विरोध कराल तर गुन्हे दाखल करणार'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लांजा : लांजा येथील पोलिस कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी सुसज्ज अशी नूतन पोलिस वसाहत बांधकामासंदर्भात शासन विचाराधीन आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला सुरवात होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी पत्रकारांना दिली. काही गावांमध्ये पोलिसांच्या मदतीने लसीकरण सुरू आहे. कोरोना टेस्ट (corona testing) आणि लसीकरणला (corona vaccine) विरोध करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल करणार, अशी तंबीही त्यांनी दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी, लांजा येथील उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. या वेळी पत्रकार यांनी विविध समस्यांसंदर्भात त्यांची भेट घेतली. या वेळी प्रामुख्याने लांजा पोलिस (lanja police) वसाहत आणि रिक्त असलेल्या लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पद याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत श्री. गर्ग यांनी म्हणाले, सध्या संपूर्ण जिल्ह्यात दोनशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कोविडमुळे सध्या पोलिस भरती रखडलेली आहे. त्यामुळे या महामारीनंतर पोलिस भरती झाल्यानंतर ही पदे भरली जातील.

हेही वाचा: 'एक मराठा लाख मराठा कोल्हापुरात पुन्हा एकदा एल्गार

पोलिस वसाहतीत लक्ष घालणार

अनेक वर्षांपासून लांजा पोलिस वसाहतीची अतिशय दुरवस्था झाली आहे. मोडकळीस आलेले छप्पर, दारे-खिडक्या, गळक्या इमारती यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना राहावे लागत आहे. ही बाब पत्रकारांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी त्यांनी सांगितले की, नवीन वसाहतीसंदर्भात प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. त्यामुळे लवकरच निधी उपलब्ध झाल्यानंतर नवीन वसाहत बांधण्याच्या कामाला सुरवात होईल.

प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित

संपूर्ण जिल्ह्यात लांजा तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे; मात्र लोकांमध्ये असलेल्या गैरसमजामुळे कोविड लसीकरण आणि तपासणीसाठी जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांतून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये पोलिसांच्या मदतीने लसीकरण सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता लोकांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोरोना टेस्ट आणि लसीकरणला विरोध करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल करणार.

हेही वाचा: अनोळखी 'फ्रेंड रिक्वेस्ट'पासून सावधान!

loading image
go to top