esakal | अनोळखी 'फ्रेंड रिक्वेस्ट'पासून सावधान! आभासी हनी ट्रॅपचे जाळे वाढतेय
sakal

बोलून बातमी शोधा

अनोळखी 'फ्रेंड रिक्वेस्ट'पासून सावधान!

अनोळखी 'फ्रेंड रिक्वेस्ट'पासून सावधान!

sakal_logo
By
पोपट पाटील

इस्लामपूर : दिवसेंदिवस मोबाईलच्या अतिवापरामुळे प्रत्यक्ष मित्रांपेक्षा फ्रेंडलिस्ट किती मोठी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. परंतु हीच अभासी जगातील मैत्री तुमच्याही न कळत तुम्हाला अडचणीत आणू शकते. या मैत्रीतून सुरवातीला बोलणे त्यानंतर चॅटिंगमुळे हनी ट्रॅपचे प्रकार वाढतच आहेत. फेसबुकवर ज्याचे प्रोफाइल स्ट्रॉंग, पोस्टमधून आपल्या संपतीचे प्रदर्शन करणारे तरुण यामध्ये टार्गेट असतात. प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा काहीतरी ज्यादा असल्याचे दाखवणारेही यात ओढले जात आहेत.

सुरवातीला केवळ बोलणे, पोस्टला लाईक झाल्यानंतर नंबर मिळवून बोलणे पुढे वाढवले जाते. त्यामधूनच अनेकांची फसगत झाली आहे. सध्या अनेक ठिकाणी अशी प्रकरणे समोर आली आहेत. वाळवा तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात काही ठिकाणी हा प्रकार समोर आला आहे. अनेक तरुण एक सुंदर तरुणी बोलतेय म्हणून त्यात गुंतत जातात व त्यामुळे पुढे मोठी फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एखाद्या अनोळखी तरुणीने संदेश पाठवल्यास त्यात आपण जास्त न गुंतता व आपली कोणतीही माहिती न देता अधिक सतर्क राहणे आवश्यक बनले आहे.

हेही वाचा: 'स्माईल प्लीज'; लॉकडाउनमुळे हरवलं फोटोग्राफर्सचं हास्य

बदनामीच्या भीतीने तक्रारी नाहीत

फेसबुकवर ओळख झाल्यानंतर वैयक्तिक नंबर मागायचा. सुरवातीस काही दिवस छान छान बोलून झाल्यानंतर सावज आपल्या जाळ्यात आले आहे याची खात्री करायची. त्यानंतर व्हिडीओ कॉल करून आक्षेपार्ह स्थितीतील कॉल रेकॉर्ड करून बदनामी करण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत. दुर्दैवाने बदनामीच्या भीतीने अनेकजण पोलिसांपर्यंत येत नसल्याने या टोळ्यांचे फावत आहे.

समाज माध्यमातून ओळख नसलेल्या व्यक्ती कडून संवाद वाढवत त्याद्वारे फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे कोणीही आपल्या परिसरातील, ओळखीच्या नसलेल्या व्यक्तीला आपल्या मित्र यादीत संविष्ट करू नये. अशा व्यक्तीचा वॉट्सॲप कॉल घेऊ नका, आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. अनोळखी तरुणीकडून आलेली फेक अकाउंट वरून आलेली विनंती स्वीकारू नये.असे प्रकार होत असल्यास ताबडतोब पोलिस ठाण्याशी संपर्क साधा.

- नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक, इस्लामपूर पोलिस ठाणे.

हेही वाचा: मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचं ठरलयं !

loading image