सुस्कारा : आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह..कोणाचे वाचा-

शिवप्रसाद देसाई
Thursday, 23 July 2020

आमदारांनी प्रशासकीय बैठकांना उपस्थिती लावली होती. त्यामुळे सर्व प्रशासकिय यंत्रणा हादरली होती.

ओरोस (सिंधुदुर्ग) : आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आल्याने कोरोना चाचणी केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर या सर्वांचे नमूने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हायसी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात नव्याने ५ रुग्ण मिळाले असून जिल्ह्याची रुग्ण संख्या २९५ झाली आहे.

 सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी याच्यासह प्रशासनामधील सर्व अधिकारी यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांचाही निगेटीव्ह रिपोर्ट आला आहे.

हेही वाचा- माणुसकी धर्मापलीकडे : रिपोर्ट निगेटिव्ह अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांनी दिला नकार ,  शेवटी मुस्लिम बांधवांनी केला अंत्यविधी... -

  शिवसेना आमदार वैभव नाईक यांना २० जुलै रोजी कोरोनाची बाधा झाली होती.  आमदारांनी प्रशासकीय बैठकांना उपस्थिती लावली होती. त्यामुळे सर्व प्रशासकिय यंत्रणा हादरली होती. त्यामुळे सर्व अधिकारी सेल्फ क्वांरनटाईन होत त्यांनी कोरोना तपासणीसाठी नमुने दिले होते. या सर्वाचा कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे याचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून सर्व अधिकारी सेवेत रुजू होत प्राशकीय कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona tested after coming in contact with Vaibhav Naik All administer report negative