दोडामार्गात कोरोनाचा चौथा बळी 

coronavirus impact dodamarg sindhudurg district
coronavirus impact dodamarg sindhudurg district

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील कसई-धाटवाडी येथील एकाचा काल (ता.13) कोरोनाने बळी घेतला. तो तालुक्‍यातील चौथा बळी ठरला. 
त्यांना सर्दी, ताप असल्याने त्यांची गुरुवारी (ता.12) चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर त्यांना ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा शुक्रवारी (ता. 13) मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. 

येथील तालुका वैद्यकीय अधिकारी रमेश कर्तसकर यांनी ही माहिती दिली. तालुक्‍यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना आणखी एका बळी गेल्याने चिंता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी एकूण रुग्णांची संख्या 277 तर सक्रिय रुग्णांची संख्या 7 वर पोचली होती. शुक्रवारी तर ती 5 झाली. त्यात दोघांची भर पडली तर त्या दोघांतील एकाचा मृत्यू झाला. दोडामार्ग आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील डेगवे आंबेखण (ता. सावंतवाडी) येथील एकाचा तर दोडामार्ग सुरुचीवाडी आणि दोडामार्ग सिद्धिविनायक कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा असा तिघांचा मृत्यू यापुर्वी झाला आहे. शुक्रवारी दोडामार्ग धाटवाडी येथील एकाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 4 झाली आहे. विशेष म्हणजे मृत चौघेही मोरगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील आहेत. 

तालुक्‍यात 279 रुग्ण 
तालुक्‍याची आजची रुग्णसंख्या 279 आहे. त्यातील 94 रुग्ण साटेली भेडशी आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेतील, 149 रुग्ण मोरगाव आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेतील, 36 रुग्ण तळकट आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेतील आहेत. मोरगाव आरोग्य केंद्रातील रुग्णांचा मृत्युदर 2.7 टक्के तर तालुक्‍याचा मृत्युदर 1.4 टक्के आहे. कसई धाटवाडी येथे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या मागे पत्नी, तीन विवाहित मुलगे, एक अविवाहित मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com