esakal | सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी 70 रूग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus impact konkan sindhudurg

सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय 675 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या 10 एवढी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. 

सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी 70 रूग्ण 

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यात आज नव्याने 70 कोरोनाचे रुग्ण आढळले. आज 33 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 6 हजार 606 झाली. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 188 झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय 675 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या 10 एवढी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. 

कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 7 हजार 475 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 188 झाली आहे. आतापर्यंत 44 हजार 389 आरटीपीसी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5088 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 31 हजार 11 नमुन्यांची ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 2512 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्ण असे 
देवगड 642, दोडामार्ग 385, कणकवली 2205, कुडाळ 1611, मालवण 729, सावंतवाडी 994, वैभववाडी 249, वेंगुर्ले 624, जिल्ह्याबाहेरील 36. जिल्ह्यात 675 रुग्ण सक्रीय असे ः देवगड 135, दोडामार्ग 14, कणकवली 143, कुडाळ 104, मालवण 91, सावंतवाडी 90, वैभववाडी 43, वेंगुर्ले 50, जिल्ह्याबाहेरील 5. 

संपादन - राहुल पाटील

loading image