पाच कोरोनाग्रस्तांची प्रकृती चिंताजनक 

coronavirus impact sindhudurg district
coronavirus impact sindhudurg district

सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यात आज नव्याने कोरोनाचे सहा रुग्ण आढळले, तर तिघांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण पाच हजार 589 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 214 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना पॉझिटिव्हपैकी पाच व्यक्तींची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 

जिल्ह्याचा मृत्यूदर हा राज्याच्या तुलनेपेक्षा जास्त आहे. रिकव्हरी रेटही कमी आहे. सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, तर कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत पाच हजार 970 रुग्ण सापडले आहेत. पैकी 161 जणांचा मृत्यू झाला आहे. 

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण ः देवगड-424, दोडामार्ग-340, कणकवली-1817, कुडाळ-1332, मालवण-516, सावंतवाडी-814, वैभववाडी-178, वेंगुर्ले-529, तर जिल्ह्याबाहेरील रुग्ण 20. सक्रिय रुग्ण ः देवगड 25, दोडामार्ग 21, कणकवली 41, कुडाळ 42, मालवण 29, सावंतवाडी 18, वैभववाडी 8, वेंगुर्ले 24, जिल्ह्याबाहेरील 6 रुग्णांचा समावेश आहे.

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com