Court Action Deputy Collector : नुकसानभरपाई दिली नाही कोर्टाने थेट उपजिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, संगणक केले जप्त; कारवाईने धावाधाव अन्...

Deputy Collector Office Seizure : नुकसानभरपाई न दिल्याने कोर्टाने थेट उपजिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि संगणक जप्त करण्याचे आदेश दिले. अचानक झालेल्या कारवाईमुळे कार्यालयात धावाधाव उडाली.
Court Action Deputy Collector

Court Action Deputy Collector

esakal

Updated on

Seizure Order Chair & Computer : सावडाव येथील धरणासाठी परवानगीशिवाय घेतलेल्या मालमत्तेची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हाधिकारी आणि भूसंपादन कार्यालयातील मालमत्तेचीच जप्ती करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले. त्यानुसार आज दुपारी जप्तीसाठी पथक दाखल होताच जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. पथकाने भूसंपादन विभागात जप्ती सुरू केली. भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांची खुर्ची, संगणक, टेबल जप्त केले. दरम्यान, कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी तत्काळ उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत स्थगितीचा आदेश आणल्याने पुढील कारवाई टळली. मात्र, जप्तीची नामुष्की ओढवल्याने प्रशासनाला मोठा धक्का बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com