रत्नागिरीत कोरोनामुक्त गावांमध्ये सापडले बाधित!

८४९ गावे कोरोनामुक्त; राजापुरात सर्वाधिक गावे
रत्नागिरीत कोरोनामुक्त गावांमध्ये सापडले बाधित!

रत्नागिरी : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने दररोज नवनवीन गावात एखादा बाधित सापडत आहे. जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक हजाराहून अधिक गावे कोरोनामुक्त होती; मात्र पंधरा दिवसात त्यात घट झाली असून सध्या ८४९ गावे कोरोनामुक्त आहेत. 'माझे गाव माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी कोरोना चाचण्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरात चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली.

दुसऱ्‍या लाटेमध्ये बाधित मोठ्या प्रमाणात वाढले. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेटही कमी झालेला नाही. गावपातळीवरील बाधितांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक कार्यवाही सुरू झाली. दिवसाला पाच ते सात हजाराच्या दरम्यान चाचण्या होऊ लागल्या. याही परिस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावे कोरोनामुक्त राहिली आहेत. हा आकडा कमी-अधिक होत आहे. जुलैच्या सुरवातीला एकही गाव बाधित नसलेल्या गावांची संख्या हजाराच्यावर होती; मात्र त्यात मोठी घट झाली आहे.

रत्नागिरीत कोरोनामुक्त गावांमध्ये सापडले बाधित!
'सेनेला संपवण्याची भाषा कराल तर शिवसैनिक बारा वाजवतील'

राजापूर तालुक्यात पंधरापेक्षा अधिक सापडलेल्या गावांची संख्या सर्वाधिक १०३ आहे. त्या पाठोपाठ चिपळूण, खेड, दापोली आणि रत्नागिरीचा क्रमांक लागतो. २५ पेक्षा अधिक बाधित असलेली गावे मोजकीच आहेत. लांजा, खेड आणि मंडणगड तालुक्यात उद्रेकजन्य स्थिती असलेली गावे कमी आहेत. जिल्हा प्रशासनाने अधिक बाधित असलेली गावे उद्रेकजन्य म्हणून घोषित करून तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित नियंत्रित ठेवणे शक्य होत आहे.

२५ पेक्षा अधिक बाधित असलेल्या गावे १८

जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायतींमध्ये १ हजार ५३४ महसुली गावे आहेत. त्यातील एकही बाधित न सापडणाऱ्‍या गावांची संख्या ८४९ आहे. तसेच ० ते १५ बाधित असलेली ४७७ गावे, १६ ते २४ पर्यंत बाधित असलेली २६ तर पंचवीसपेक्षा अधिक बाधित असलेल्या गावांची संख्या १८ आहे. एकापेक्षा अधिक बाधित सापडणाऱ्‍या गावांच्या संख्येत वाढ झाली आहे.

रत्नागिरीत कोरोनामुक्त गावांमध्ये सापडले बाधित!
Kokan - राजापूरातील रिफायनरीला शिवसैनिकांचे वाढते समर्थन

तालुका कोरोनामुक्त गावे

  • मंडणगड ८०

  • दापोली ११६

  • खेड ५३

  • गुहागर ७८

  • चिपळूण ६२

  • संगमेश्‍वर ९५

  • रत्नागिरी ३७

  • लांजा ९८

  • राजापूर १२६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com