त्रिसदस्य समितीचा वॉच ; खासगी कोविड सेंटरसाठी दरपत्रक निश्‍चित

राजेश शेळके
Tuesday, 22 September 2020

त्रिसदस्य समितीचा वॉच; शुल्काबाबत तक्रारी, उल्लंघन केल्यास कारवाई  

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधितांना योग्य उपचार मिळावा, यासाठी जिल्ह्यात आणखी ७ खासगी कोविड सेंटर सुरू केली आहेत. या संकटामध्ये रुग्णांच्या खिशाला चाट बसू नये, यासाठी शासनाने दरपत्रक ठरवले आहे. त्यातूनही रुग्णांची आर्थिक लूट होत असेल तर जिल्हा प्रशासनाची त्रिसदस्य समिती यावर वॉच ठेवणार आहे. नियमांना बगल देऊन पैसे घेतल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे. 

जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता साडेसहा हजारांच्या पुढे गेला आहे. तर मृतांच्या संख्येने २०० पार केले आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आणखी रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. ऑक्‍टोबरपर्यंत जिल्ह्यात आणखी ८ ते ९ हजार रुग्ण वाढण्याची शक्‍यता यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. प्रशासाने जास्त बेडची व्यवस्था केली असली तरी खासगी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात ७ खासगी कोविड सेंटर सुरू आहेत.

हेही वाचा-सिंधुदुर्गात यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द -

यामध्ये रत्नागिरी २, लांजा २, चिपळूण येथे ३ खासीग कोविड सेंटर आहेत. खासगी रुग्णालयामध्ये मनमानी दर आकारुन लूट केली जात असल्याच्या तक्रारी काही ठिकाणहून आल्या आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी बाधित रुग्णांसाठी शासनमान्य दरपत्रक बंधनकारक आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य अधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी, तहसीलदार किंवा नायबतहसीलदार ही त्रिसदस्ययी समिती नेमली आहे. ती या खासगी कोविड सेंटरना भेट देऊन त्यांची वारंवार तपासणी करेल, अशी माहिती प्रशासनाने दिली. 

हेही वाचा- मंडणगडच्या  कलाकारांनी  बिंबवले कोरोनाचे  गांभीर्य  : -

...हे न केल्यास करा तक्रार
यातूनही जादा दर आकारणी केल्यास, रुग्णालयात बेड न दिल्यास, बिलाची अवाजवी आकरणी केल्यास तक्रार निवारण केंद्र सुरू केली आहेत. त्यामध्ये १०७७ हा हेल्पलाईन नंबर आहे. व्हॉट्‌सॲप क्र. ९४०३०९४३०० यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

दृष्टिक्षेपात...
  जनरल वॉर्ड विलगीकरण कक्ष दिवसाचे शुल्क ४,००० 
  अतिदक्षता विभाग विलगीकरण दिवसाला ७,५०० 
  व्हेंटिलेटरवर रुग्ण असल्यास दिवसाला ९,०००

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid hospital Watch the three-member committee of the district administration